Milind Naik and Sankalp Amonkar  Dainik Gomantak
गोवा

मुरगावची लढत अटीतटीची; विनयभंग कळीचा मुद्दा?

तू-तू मै-मै ला राजकीय किनार ?

दैनिक गोमन्तक

मुरगाव हा मुरगाव तालुक्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. सध्या हा मतदारसंघ माजीमंत्री मिलिंद नाईक यांच्या कथित विनयभंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणाला दोन कंगोरे आहेत. एका बाजूला काही लोक हे प्रकरण कॉंग्रेसने (Congress) उभा केलेला ‘राजकीय स्टंट’ असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणात दम असल्याचे बोलले जाते. पण पोलिसांनी मिलिंद नाईक यांना क्लीनचीट दिल्यामुळे सध्या ते ‘तो मी नव्हेच’ अशाच अविर्भावात वागताहेत.

मात्र भाजप (BJP) विरूध्दच्या प्रत्येक सभेचे हे प्रकरण म्हणजे एक केंद्रबिंदूच बनला आहे. तसे पाहायला गेल्यास मिलिंद नाईक व कॉंग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्यातील मुरगावची लढत म्हणजे भारत पाकिस्तान ‘20-20’ सामन्यासारखी थरारक झाली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी संकल्प आमोणकर यांच्यावर अगदी निसटत्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला आहे,त्यामुळे या लढतीला एक अनोखी धार लाभली आहे. 2017 साली तर मिलिंद नाईक यांनी फक्त 140 मतांनी विजय मिळवला होता. आणि आता तिसऱ्यांदा ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर ठाकले आहेत.

मिलिंद विरूध्द विनयभंग प्रकरण असले तरी त्यांची मुरगावातील (Margao) शक्ती दुर्लक्षित करण्यासारखी खचितच नाही. आमोणकर हे राज्यातील कॉंग्रेसचे एक प्रमुख नेते असल्यामुळे तसेच त्यांच्या पत्नी श्रध्दा मुरगावच्या नगरसेविका असल्यामुळे त्यांचीही मुरगावात बऱ्यापैकी शक्ती आहे. त्यामुळे यावेळी मुरगावचा गड ‘सर’ करायचाच या निर्धाराने संकल्प व त्यांचे कार्यकर्ते झटताना दिसत आहेत. या दोघांबरोबर आपचे परशुराम सोनुर्लेकर, राष्ट्रवादीचे महम्मद शेख, आरजीचे परेश तोरस्कर, व तृणमूलचे जयेश शेटगावकर हे ही रिंगणात आहेत. तसेच इनायतुल्ला खान यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

मतदारसंघात बहुतांश बिगर गोमंतकीय असून मुस्लिमांची लक्षणीय संख्या आहे. यामुळे पूर्वी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या दोन निवडणुकीत (Election) भाजपने बाजी मारली होती. गतवेळी आपमुळे कॉंग्रेसच्या संकल्प यांचा पराभव झाला, असे म्हटले जात होते. आता ते कोणती भूमिका ‘अदा’ करतात हे पाहावे लागेल.

तू-तू मै-मै ला राजकीय किनार ?

माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर इतर अनेक आरोप असल्यामुळे ते यावेळी कसे तोंड देतात, ते बघावे लागेल. मुरगाव नगरपालिकेवरही त्यांचे चांगले वर्चस्व असल्यामुळे ती एक त्यांची जमेची बाजू ठरू शकते. तरीही राज्यात असलेली भाजप विरोधी लाट त्याच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाईकांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.नंतर हे प्रकरण संकल्प यांच्यावर उलटते, का अशी स्थिती निर्माण झाली होती. संकल्प व मिलिंद यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ ला राजकीय (Politics) ‘किनार’ असल्याचे मात्र स्पष्ट झाले होते. आता मुरगावचे मतदार याला किती प्रतिसाद देतात, हे बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT