Sports News Dainik Gomantak
गोवा

ISL Football: नियमभंग केलेल्या जमशेदपूरवर कारवाई; मुंबई सिटी 'विजयी'

दैनिक गोमन्तक

ISL Football:

सामन्यातील भारतीय खेळाडूंच्या संख्येबाबत नियमभंग केलेल्या जमशेदपूर एफसीवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कारवाई करत मुंबई सिटी संघाला 3-0 फरकाने विजयी घोषित केले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील माजी विजेत्यांना तीन गुणांचा लाभ झाला आणि त्याचबरोबर त्यांचा ‘शिल्ड’ जिंकण्याचा दावाही भक्कम झाला.

आयएसएल स्पर्धा आयोजकांतर्फे जमशेदपूर एफसीवरील कारवाईची माहिती बुधवारी देण्यात आली. गेल्या 8 मार्च रोजी जमशेदपूर येथे मुंबई सिटी व जमशेदपूर एफसी संघातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला होता,

त्यानंतर मुंबई सिटीने ‘एआयएफएफ’कडे अधिकृत निषेध नोंदविला होता. सामन्याच्या वेळेस मैदानावर किमान सात स्थानिक खेळाडूंना खेळविण्यास जमशेदपूर एफसी संघ असमर्थ ठरला अशी तक्रार मुंबई सिटीने केली होती.

आयएसएल 2023-24 लीग नियमांच्या पालनासंदर्भात संबंधित निषेधाचे पुनरावलोकन केलेल्यानंतर एआयएफएफ शिस्तपालन समितीने मुंबई सिटीच्या बाजूने निकाल दिला.

या निर्णयाच्या आधारे जमशेदपूर एफसीचा सामन्यातील निकाल मागे घेण्यात आला व त्यांना सुधारित 0-3 गोलफरकाने पराभूत ठरविण्यात आले. निर्णयानंतर सामन्याच्या निकालानुसार स्पर्धेच्या गुणतक्त्यात बदल करण्यात आला आहे.

दोन गुणांचा फरक

जमशेदपूर एफसीविरुद्ध 3-0 फरकाने विजयी घोषित करण्यात आल्यामुळे मुंबई सिटी एफसी संघ आता दोन गुणांच्या फरकाने गुणतक्त्यात निर्विवाद अग्रस्थानी आला आहे. 19 सामन्यांतून त्यांचे आता 41 गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील मोहन बागानचे 39 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवाचे ३६ गुण, तर चौथ्या क्रमांकावरील ओडिशा एफसीचे 35 गुण आहेत.

आयएसएल गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर राहणारा संघ लीग शिल्डचा मानकरी ठरेल आणि या संघाला एएफसी चॅंपियन्स लीग 2 स्पर्धेसाठीही पात्रता मिळेल. येत्या 14 एप्रिल रोजी मोहन बागान व मुंबई सिटी यांच्यात सामना होणार आहे, त्या लढतीतील निकालानंतर शिल्डचा मानकरी निश्चित होण्याचे संकेत आहेत.

पराभवामुळे गुणतक्त्यात घसरण

बरोबरीचा एक गुण मागे घेत पराभूत घोषित केल्यामुळे जमशेदपूर एफसीची आठव्या क्रमांकावर घसरण झाली. त्यांचे आता 19 सामन्यांतून 20 गुण झाले आहेत. आयएसएल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीस पहिले सहा संघ पात्र ठरतात. त्यामुळे मुंबई सिटीविरुद्धच्या प्रतिकुल निकालाचा जमशेदपूरला फटका बसू शकतो. पंजाब एफसी व बंगळूर एफसी यांचे प्रत्येकी २१ गुण असून ते अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत. जमशेदपूर नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रत्येकी 20 गुण आहेत.

‘त्या’ सामन्यात काय घडले?

गेल्या 8 मार्च रोजी झालेल्या सामन्याच्या 86 व्या मिनिटास जमशेदपूर एफसीने खेळाडूंची अदलाबदल केली. त्यानुसार भारतीय मध्यरक्षक इम्रान खान याला माघारी बोलावून त्याच्या जागी स्वित्झर्लंडचा खेळाडू ॲलेन स्टेव्हानोविच याला मैदानावर पाचारण केले. त्यामुळे सामना सुरू असताना मैदानावरील भारतीय खेळाडूंची संख्या सहा झाली. आयएसएल 2023-24 च्या नियम 4.2.10 नुसार सामना सुरू असताना मैदानावर सात भारतीय खेळाडू असणे बंधनकारक आहे. फक्त भारतीय खेळाडूस सामन्यात रेड कार्ड मिळाल्यास हा नियम लागू होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT