Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: सनबर्नवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून झालीच नाही...

ॲड. फेरेरा ः कार्यक्रम बंद पाडण्यापेक्षा साहित्य जप्त करा

दैनिक गोमन्तक

Sunburn Goa 2023: सनबर्न सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) पोलिसांनी कारवाई केली, परंतु ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाला अनसुरून झालेली नाही. ईडीएमचा आवाज जर उच्च न्यायालयाने घातलेल्या अटीपेक्षा वाढला, तर तो कार्यक्रम बंद करावा आणि कार्यक्रमासाठी वापरलेली साधने जप्त करायला हवी होती, ते सरकारी यंत्रणेकडून झाले नसल्याची टीका आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी शनिवारी केली.

ॲड. फेरेरा यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सनबर्न ज्या ठिकाणी आयोजित केला होता, त्या ठिकाणी खरोखरच ध्वनिप्रदूषण होत होते. जेव्हा आवाजाची मर्यादा ओलांडली म्हणून पोलिसांनी जी कारवाई केली व एका व्यासपीठावर (स्टेजवर) पोलिसांनी यंत्रणा बंद पाडली. खरे तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सनबर्नची सर्व साधनसामग्री पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवी होती.

उच्च न्यायालयाने ज्या सरकारी अंमलबजावणी समितीला कार्यवाही करावयाच्या तरतुदींचे पालन करायला सांगितले होते, त्यांचे वाचन करून ॲड. फेरेरा म्हणाले, आपण त्या ठिकाणची स्वतः जाऊन पाहणी केली.

सनबर्नचा शनिवारचा शेवटचा दिवस, त्यामुळे ते मोकळीक मिळाल्याप्रमाणे वागतील आणि पुढे काय होईल ते पाहू, अशी त्यांची भूमिका राहील, असेही फेरेरा यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी जे साहित्य वापरले आहे, ते जर जप्त केले, तर कार्यक्रम पूर्णपणे बंद होतो. अशा कार्यक्रमात विविध स्टेज उभारणी कशासाठी? असा सवालही त्यांनी केला. कार्यक्रम बंद करायचे आदेश नाहीत, तर साहित्य जप्त करण्याचे आदेश आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला सांगितलेल्या सरकारी यंत्रणेने आपली ठाम भूमिका घेऊन कारवाई करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्याला काहीजणांचे कॉल आले, ‘एका नव्या नाईट क्लबचे उद्‍घाटन झाले आहे आणि तेथे रात्री दहानंतरही संगीत वाजवत आहेत. त्याविरोधात आम्ही पोलिसांमध्ये तक्रारही दिली. परंतु नाईट क्लबमधील काही लोक येऊन तक्रारदारांना तुम्हाला काय हवे आहे, असे सांगत त्यांना दमबाजी करतात.’ त्यामुळे पोलिसच त्यांना सामील असल्याचा संशय येतो, असेही ॲड. फेरेरा म्हणाले.

‘लोकांना शांत, निवांत जीवन हवे’

लोकांना शांत आणि निवांतपणे जीवन हवे आहे. पोलिस नाईट क्लबमधील धिंगाणा आणि आवाजाविरुद्धच्या तक्रारींची दखल का घेत नाहीत याचे आश्‍चर्य वाटते. इतर ठिकाणी ते व्यस्त असतील हे आपण समजू शकतो, परंतु खुल्या जागेत जर कार्यक्रम होत असतील आणि त्याचा आवाज सर्वत्र पसरत असेल, तर अशा ठिकाणी दहा वाजल्यानंतर संगीत वाजले नाही पाहिजे असे आपले म्हणणे आहे, असे आमदार ॲड. कार्लोस फेरेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT