Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यातील अपघात सत्र काही थांबेना, म्हापशातील घटनेत दोन जखमी तर फोंड्यात चालक बालंबाल बचावला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident म्हापसा येथे प्रवाशी बसची दुभाजकाला धडक बसून दोघे जखमी झाले. तर अन्य एका घटनेत सुकतळी मोले येथे रस्त्यालगत बंद पडलेल्या टाटा टेंम्पोने मागून धडक दिल्याने टेंम्पोचे मोठे नुकसान झाले. यात बंद पडलेल्या गाडीतील चालक बचावला.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बोडगेश्वर मंदिराजवळील काणका रस्त्यावर एक खासगी प्रवासी बस दुभाजक व वीजखांबला धडक दिल्यामुळे उलटली.

यात बस चालकासह एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, इतर प्रवासी नंतर माघारी येणाऱ्या बसमधून पुढे आपल्या गंतव्यस्थानाकडे मार्गस्थ झाले.

प्राप्त माहितीनुसार, हा अपघात शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडला. संततधार पावसात सदर बस (जीए ०३ टी ९७८६) दुभाजक व वीजखांबला धडकली आणि रस्त्यावर उलटली. यावेळी सर्व सीटवर प्रवासी बसले होते, कुणीही उभे प्रवासी नव्हते. ही बस कळंगुट-कांदोळीला जात होती.

उभ्या ट्रकला मागून धडक; टेम्पोची हानी

सुकतळे- मोले येथे रस्त्यालगत बंद पडल्याने उभी केलेल्या लेलॅंड ट्रकला पाठीमागून येणाऱ्या टाटा टेंम्पोने मागून धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. घटनेत चालक बालंबाल बचावला.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकतळे मोले येथील महामार्गावरील एका वळणावर आज सकाळी १०.४५ वाजता रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या टेंम्पोने जोरदार धडक दिली.

दोन्ही वाहने उसगांवच्या दिशेने जात होती. क्लीनर साईडला धडक बसल्याने चालक संतोष गावडे (रा.उसगाव)हा बचावला. मात्र, टेंपोचे मोठे नुकसान झाले.कुळे पो.निरीक्षक सगुण सावंत याच्या मार्गदर्शनखाली हवालदार प्रेमानंद गावकर यांनी पंचनामा केला.

दर्शनी काच फुटून दोघे बाहेर

या अपघातात बसचालक नझीर अहमद (सांगोल्डा) व प्रवासी आनंद कांदोळकर (कांदोळी) हे जखमी झालेत. यावेळी प्रवासी बसचा आपत्कालीन दरवाजा व केबिन समोरील मुख्य काच फुटल्याने तिथून बाहेर पडले.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, तर समोरील बाजूचे टायर निखळून बाहेर आले. आणि या अपघातात दुभाजकमधील वीजखांब मोडून पडला.

पर्वरीत अपघात ; अर्धा तास वाहतूक कोंडी

पर्वरी येथे सातत्याने घडत असलेल्या अपघातांची शृंखला थांबत नसून, आज दि.२४ रोजी सकाळी ११.३० वाजता येथील मॅजेस्टिक हॉटेल समोर महामार्गावर एका ट्रकने मिनी ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला.

चालकाने अपघातानंतर पलायन केले. त्यामुळे रस्त्यावर आडवा असलेला ट्रक हटवण्यासाठी वाहतूक अर्धा तास बंद ठेवण्यात आली. आज पर्वरीहून पणजीला जाणाऱ्या मिनी ट्रक (जीए ०८ टी ५३४१) याला एका मोठ्या ट्रकने धडक दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT