The accident of the police constable going to inspect the accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case अपघात पाहणीसाठी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघात!

दरम्यान दोघांना देखील उपचाराअंती इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

दैनिक गोमन्तक

सांकवाळ: सांकवाळ येथे अपघात पाहणीसाठी जाणाऱ्या पोलीस हवालदार आशिष कुमार व पोलीस कॉन्स्टेबल सागर राणे यांच्या दुचाकीला कारची धडक बसली. दरम्यान दोघांना देखील उपचाराअंती इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

(The accident of the police constable going to inspect the accident)

सेर्नाभाटी कोलवा येथे झालेल्या अपघाताचा थरकाप अजूनही ताजा

15 जानेवारी रोजी रात्री सेर्नाभाटी कोलवा येथे झालेल्या त्या दुर्घटनेने लोकांच्या मनाचा थरकाप उडविला होता. कोलवा येथे नाकाबंदीवर असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने आधी रस्त्यावरील बॅरीकेड्स उडवले त्यानंतर अन्य दोन गाड्यांना ठोकरत ड्युटीवर असलेल्या शैलेश गावकर व विश्वास देईकर या दोन पोलीस शिपायांचा प्राण घेतला होता. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची ही घटना आज राज्यातील घडणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा ताजी झाली.

15 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातप्रकरणी कोलवा पोलिसांनी कारचालकावर आरोपपत्र दाखल केले. त्यासंदर्भात सुनावणीही सुरू झाली आहे. त्या रात्रीचा तो थरकाप लोक अजूनही विसरलेले नाहीत.

अबकारी खात्यातील कर्मचारीही गेला

आणखी एक प्रकार 26 फेब्रुवारी रोजी गुडी पारोडा येथे घडला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने स्कुटरला धडक दिल्याने विजय पैगीणकर या अबकारी खात्यातील कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. अन्य दोन अपघातांत स्वतः वाहनचालकांना आणि आतील बसलेल्यांना जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT