Aguada Fort  Dainik Gomantak
गोवा

Aguada Jail: आग्वाद किल्ल्यातील 'तो' निर्णय म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान

आग्वाद कारागृहात बार सुरु केल्याने संतप्त प्रतिक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

आग्वाद कारागृहात बार सुरु केल्याने कळंगुट मतदार संघ नाराज झाला असून त्यांच्यामधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कारागृहात बार सुरु करून गोवा सरकार आणि पर्यटन खात्याने अक्षरशः स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया कळंगुट मतदार संघातून येतेय. या प्रकरणी सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी यासंदर्भात नवजीवन सोसायटी ऑफ फ्रिडम फायटर असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनीही आपली आक्रमक भूमिका मांडली होती. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, आग्वाद किल्ला हा आपल्या प्रत्येकासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे. गोव्याला मुक्ती देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

अशा ठिकाणी मद्यालय असणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपण किमान स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आदर म्हणून तरी अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. त्यामुळे मी असोसिएशनतर्फे हे मद्यालय ताबडतोब बंद करण्याची मागणी करतो. त्याचबरोबर या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घालावे अशी विनंती करतो.

आग्वाद किल्ला हे इथल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मद्य विक्री सुरू असल्यामुळे अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT