Thane Dongurli Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Thane Dongurli: वीज समस्येविरुद्ध मोठे पाऊल; ठाणे-डोंगुर्ली पंचायतीचा हेल्पलाईन क्रमांक जारी

Thane Dongurli Panchayat : हेल्पलाईन मंत्री विश्वजीत राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आलेली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: ठाणे - डोंगुर्ली पंचायतीने आपल्या क्षेत्रातील वीज समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. या ‘हेल्पलाईन’चे अनावरण आज पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणेचे सरपंच नीलेश परवार, उपसरपंच तनया गावकर, पंच सरिता गावकर, अनुष्का गावस, सोनिया गावकर, सुभाष गावडे, विनायक गावस आदी उपस्थित होते.

आमदार डाॅ. दिव्या राणे म्हणाल्या, ठाणे पंचायतीने उचललेले हे मोठे पाऊल असून या अभिनव उपक्रमातून ठाणे पंचायतीत विजेसंबंधी समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वीज समस्या जाणवत होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत होते.

येथे साधा संपर्क...

सरपंच नीलेश परवार म्हणाले, अशी हेल्पलाईन सुरू करणारी ठाणे ही पहिली पंचायत आहे. आता कुणालाही विजेसंबंधी समस्या भासली, तर त्यांनी जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. हेल्पलाईन मंत्री विश्वजीत राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आलेली आहे. विजेसंबंधी तक्रारीसाठी पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी ९४०३०८६१५८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

SCROLL FOR NEXT