Peddem Junction Accident Dainik Gomantak
गोवा

Peddem Junction Accident: पेडे जंक्शनवर 6 वाहनांमध्ये विचित्र अपघात; 2 मुलांसह 5 जण जखमी

अपघातात तीन ट्रक आणि तीन दुचाकींचा समावेश आहे.

Kavya Powar

Peddem Junction Accident: पेडे जंक्शनवर आज (रविवार, 28 जानेवारी) 6 वाहनांमध्ये विचित्र अपघात घडला. यामध्ये तीन ट्रक आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. ही घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली असून यामध्ये एकूण पाचजण किरकोळ जखमी झाले असल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पेडे जंक्शनवर पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि त्याचवेळी तिथून टर्न घेणाऱ्या पाण्याच्या टॅंकरमध्ये जोरदार धडक झाली. यानंतर वेगात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना चिरडले.

ईअन फर्नांडिस (34, पेडे), मोहनलाल कामी (38, करासवाडा), मनिष कामी (11, करासवाडा), प्रवीण सातार्डेकर (44, म्हापसा), उर्वी सातार्डेकर (32, म्हापसा) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना त्वरित म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

दरम्यान, यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेनंतर तिथल्या जमावाने ट्रकचालकाला मारहाण केल्याचे कळते. महत्वाची बाब म्हणजे, अपघात पाचजण जखमी झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT