tenth standard result to be declared in a week in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दहावीचा निकाल आठवडाभरात

शालांत मंडळाची आमसभा : समितीसाठी इच्‍छुकांचे अर्ज

दैनिक गोमन्तक

पणजी : बारावीच्या निकालानंतर लगेच आठवडाभरात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली होती. मात्र, आता दहावीचा निकाल आठवडाभरात जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आमसभा पर्वरी येथील मंडळाच्‍या मुख्य कार्यालयात पार पडली. या बैठकीत नियमित विषयांसह केंद्र सरकार आणि राज्‍य सरकारच्‍या शैक्षणिक योजना, धोरणात्‍मक निर्णय, त्‍यांची अंमलबजावणी आदी विषयांवर चर्चा झाल्‍याची माहिती मंडळाचे स्‍वीकृत सदस्य तथा वास्‍कोचे आमदार दाजी साळकर यांनी दिली. या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, स्‍वीकृत सदस्य तथा सावर्डेचे आमदार गणेश गावकर आणि इतर सदस्य उपस्‍थित होते. दहावीच्‍या निकालाविषयी विचारले असता साळकर म्‍हणाले, दहावी परीक्षांच्‍या निकालाची तारीख येत्‍या चार-पाच दिवसांत जाहीर केली जाईल.

गोवा शालांत मंडळाच्या नवीन सदस्यांची निवड डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. तब्बल सहा महिन्‍यांनंतर मंडळाची आमसभा झाली. आजच्‍या बैठकीत मंडळाच्‍या कार्यकारी समितीसह विविध समित्‍या निवडण्याची प्रक्रिया सुरू झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी इच्‍छुकांनी अर्ज दाखल केले असून पुढील महिन्‍यात निवडणूक होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शालांत मंडळामध्ये एनसीईआरटी, कला व संस्‍कृती, क्रीडा, खाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, प्राचार्य आदींचा समावेश असतो. तसेच मंडळांतर्गत कार्यकारी समितीसह इतर समित्‍या असतात. या समित्‍यांची निवडणूक पुढील महिन्‍यात होणार आहे. नवीन मंडळाची स्‍थापना होऊनही आमसभा घेण्यास सहा महिन्‍यांचा कालावधी का लागला, असा प्रश्‍न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT