National Tribal Convention In Goa Dainik Gomantak
गोवा

National Tribal Convention: मडगावात राष्ट्रीय आदिवासी अधिवेशन, 12 व 13 रोजी आयोजन; तीन हजार प्रतिनिधी होणार सहभागी

National Tribal Convention In Goa: दहावे राष्ट्रीय आदिवासी अधिवेशन १२ व १३ सप्टेंबर रोजी नावेली, मडगाव येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहे.

Sameer Amunekar

सासष्टी: आदिवासी समन्वय मंच भारत व गाकुवेध फेडरेशन गोवातर्फे दहावे राष्ट्रीय आदिवासी अधिवेशन १२ व १३ सप्टेंबर रोजी नावेली, मडगाव येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहे.

१३ रोजी साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय आदिवासी हक्क दिनाचे औचित्य साधून या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील २५ राज्यांतील तीन हजार आदिवासी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गाकुवेधचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली.

याप्रसंगी आदिवासी समन्वय मंच भारताचे निमंत्रक व सल्लागार अशोक चौधरी, संयोजक उत्पल, गाकुवेधचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी, सल्लागार रवींद्र वेळीप व इतर उपस्थित होते. या अधिवेशनाला राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडून सहकार्य लाभले आहे.

देशाच्या घटनेमध्ये आदिवासी समाजाला जे हक्क दिले आहेत त्या संदर्भातील माहिती समाजातील सर्व बांधवापर्यंत पोहोचविणे हा या अधिवेशनाचा उद्देश असल्याचे अशोक चौधरी यांनी सांगितले. देशात १० कोटी आदिवासी समाजबांधव आहेत.

त्यातील अनेकांचा विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीमुळे अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याबद्दल या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

शिवाय आदिवासी समाज बांधवांकडे झाडे झुडुपे, पक्षी, जनावरे, औषधीसारखे ज्ञान बाकी आहे, त्याबद्दल चर्चा केली जाणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

तवडकर यांच्या हस्ते उद्‍घाटन

१२ रोजी सकाळी होणाऱ्या अधिवेशनाच्या उद्‍घाटन सोहळ्यास आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

सावर्डेचे आमदार गणेश गावकर सन्माननीय अतिथी म्हणून तर आमदार आंतोन वाझ, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर हे उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळ्यात पर्यावरणाचा सांभाळ संदर्भात गोवा घोषणापत्र जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

SCROLL FOR NEXT