Goa Accident News: गोव्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच शनिवारी (25 जानेवारी रोजी) संध्याकाळी काकोडा येथून अशीच अपघाताची घटना समोर आली. काकोडा येथील मारुतीगड मंदिर रस्त्यावर झालेल्या अपघातात एका सायकलस्वार 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पीडित मुलाबरोबर त्याचा मित्रही होता. घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली.
दरम्यान, मारुतीगड रस्त्यावरील उतारावरुन जात असताना सायकलवरील नियंत्रण सुटल्याने तो जीवानिशी गेला. त्याची सायकल रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या कंपाउंडवर जावून आदळली, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तात्काळ मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्याबरोबर सायकलवर पाठीमागे बसलेल्या मुलावर कांदोळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्देवी अपघाताच्या घटनेविषयी कुडचडे पोलिसांना कळवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी, फोंडा तालुक्यातील शिरोडा येथून भीषण अपघाताची घटना समोर आली होती. एका दुचाकीस्वराला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट एका घराला धडक दिली. हा अपघात जरी भयंकर असला तरीही सुदैवाने यात घरातील कुठल्याही मंडळींना किंवा ट्रक ड्राइव्हरला दुखापत झाली नाही, मात्र दुचाकीचालकाला मार बसल्याने उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.