Town Square Dainik Gomantak
गोवा

Town Square Goa: पर्वरीत 110 कोटींची टाऊन स्क्वेअरची निविदा जारी; पर्यटकांना मिळणार सांस्कृतिक अनुभवाची 'प्रेक्षणीय' संधी

Town Square Project Porvorim: ११० कोटी रुपयांच्या टाऊन स्क्वेअरच्या विकासामुळे पर्वरी शहराला वेळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पर्वरी: येत्या काही दिवसांमध्ये पर्वरी शहरात एक मोठा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. ११० कोटी रुपयांच्या टाऊन स्क्वेअरच्या विकासामुळे पर्वरी शहराला वेळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) ने या प्रकल्पासाठी निविदा जारी केली आहे. हा प्रकल्प गोवा गृहनिर्माण मंडळाने प्रदान केलेल्या १०,९२३ चौरस मीटर जागेवर बांधला जाईल.

पर्वरीतील नियोजित टाऊन स्क्वेअरमध्ये विविध प्रकारचे अनुभव देणारे पाच वेगळे झोन तयार केले जातील.

हायलाइट्समध्ये एक संगीत कारंजे, वॉचटॉवर, स्प्लॅश पॅड आणि प्रोजेक्शन मॅपिंग क्षमता असलेले मूव्ही कोर्ट असलेले सेंट्रल कोर्ट यांचा समावेश आहे आणि बाकी वैशिष्ठ्यांमध्ये ॲम्फीथिएटर, मार्केट कोर्ट, फूड कोर्ट, फ्ली मार्केट, पॉप-अप बाजार, दुकाने आणि बहु-कार्यक्षम जागा नियोजित करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी २०० वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगचीही व्यवस्था केली जाईल.

स्थानिक कला आणि परंपरांवर भर देत पर्वरीत उभ्या राहण्याऱ्या टाऊन स्क्वेअरमध्ये हेरिटेज कोर्टचा समावेश करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्रालयाने या उपक्रमासाठी आधीच ९०.७४ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि आता जीटीडीसी निविदा प्रक्रियेसह पुढे जात आहे. हा प्रकल्प उभा राहण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी जमीन हस्तांतरणाचा प्रस्तावही पर्यटन विभागाने गृहनिर्माण मंडळाकडे सादर केला आहे. पर्वरीत उभ्या राहणाऱ्या या टाऊन स्क्वेअरमुळे स्थानिक तसेच पर्यटकांना गोव्यातील संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT