Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: दोन रो-रो फेरीबोटींसाठी निविदा

Goa Ferry Boat: बांधा व वापरा तत्त्वाचा वापर: चोडण-रायबंदर जलमार्गावर धावणार

दैनिक गोमन्तक

Goa Ferry Boat: राज्यातील सर्वात जास्त वापर असणाऱ्या आणि सतत व्यस्त असणाऱ्या चोडण ते रायबंदर या जलमार्गावर नदी परिवहन खात्याने रो-रो या कमी अवजड वाहतूक करणारी वाहने आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन बोटी तयार करून घेण्याचे निश्‍चित केले आहे.

बांधा आणि चालवा या धर्तीवर या दोन बोटी बांधल्या जाणार असून, त्यासाठी खात्याने 10 कोटींची निविदा काढलेली आहे.

नदी परिवहन खात्याचा पदभार सुभाष फळदेसाई यांच्याकडे आल्यापासून त्यांनी खात्याच्या कामात तत्परता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय २०२१ मध्ये त्यांनी नदी परिवहनच्या अधिकाऱ्यांना घेऊन केरळमध्ये जाऊन रो-रो फेरीबोट सेवेची पाहणी केली होती. तत्कालीन बंदर कप्तान विभागाचे कॅप्टन जेम्स ब्रागांझाही हेसुद्धा पाहणीसाठी गेले होते.

त्यावेळी केरळमध्ये पाहिलेल्या ‘रो-रो’ फेरीबोटीची त्यावेळची किंमत साधारण दहा कोटी रुपये होत आणि ती आकारानेही मोठी होती.

परंतु गोवा सरकारने पाच-पाच कोटींना त्या रो-रो फेरीबोटी बांधण्यासाठीची निविदा काढली आहे. चोडण ते रायबंदर या मार्गावर नदी परिवहन खात्याला चार किंवा तीन फेरीबोटी चालवाव्या लागतात.

सर्वात जास्त प्रवासी व वाहनांची वाहतूक करणारा हा मार्ग आहे. त्यामुळे नदी परिवहन खात्याने जी रो-रो फेरीबोटीची निविदा काढली आहे. त्या फेरीबोटीमध्ये १२ ते १४ चार चाकी वाहने अथवा कमी वजनाची मालवाहतूक करणारी वाहने आणि ५० प्रवासी वाहतूक करता येईल अशी बांधणी असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT