Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्कोच्या इतिहासातील एक पर्व संपणार; उच्च न्यायालयाचा आदेश, दोन आठवड्यांत जमीनदोस्त होणार वास्कोचे 'निओगी मॅन्शन'

Neogi Mansion Demolition: उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत ‘निओगी मॅन्शन’ पाडण्याचे आदेश दिल्यानंतर वास्कोतील या ऐतिहासिक वास्तूतील भाडेकरू, रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत ‘निओगी मॅन्शन’ पाडण्याचे आदेश दिल्यानंतर वास्कोतील या ऐतिहासिक वास्तूतील भाडेकरू, रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाडकामाची तयारी सुरू होताच अनेक जणांनी घाईघाईने आपले साहित्‍य हलविण्यास सुरुवात केली.

भाडेकरूंच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून इमारत रिकामी करण्यास सांगितल्यानंतरच त्यांना या कायदेशीर प्रक्रियेची माहिती मिळाली. इमारतीच्या भवितव्याबाबत मालकांकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.

राजीव नेवगी यांनी मुरगाव पालिकेच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने इमारत पाडण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २० लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले पाडकाम मालक स्वतःच्या खर्चाने करणार आहेत. निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास महानगरपालिकेला पुढील चार आठवड्यांत पाडकाम करण्याचे निर्देश न्यायालयानेदिले आहेत.

दरम्यान, इमारतीतील दुकाने, कार्यालये आणि रहिवासी आपले फर्निचर, यंत्रसामग्री, कागदपत्रे व इतर साहित्य स्थलांतरित करताना दिसत आहेत. अनेकांसाठी निओगी मॅन्शन हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ घर किंवा व्यवसायाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे या वास्तूशी असलेले भावनिक नाते तुटत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT