Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Shooting Incidents: 'कायदा-सुव्यवस्था आहे कुठे?' राज्यातील गोळीबाराच्या घटनांवर युरी आलेमाव आक्रमक, 10 वर्षांत 10 घटनांचा दिला दाखला

Goa Shooting Incidents Last 10 Years: पर्वरी पोलिस स्थानकापासून हाकेच्‍या अंतरावर असलेल्या कॅसिनो परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला धारेवर धरले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी पोलिस स्थानकापासून हाकेच्‍या अंतरावर असलेल्या कॅसिनो परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी शून्य प्रहरावेळी केला.

गोळीबाराची ही पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्री सांगत असले तरी मागील दहा वर्षांत साळगाव, वागातोर, शिवोलीसह राज्यातील विविध भागांत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. वर्षाला किमान एक गोळीबाराची घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.

कॅसिनोंमुळे गुन्हेगारी, मानवी तस्करीसह विविध गैरप्रकार वाढत आहेत. त्यामुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोपही युरी आलेमाव यांनी केला. पर्वरी गोळीबारातील हल्लेखोर अद्याप मोकाट असून सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हल्लेखोरांना तुरुंगात टाकणार : मुख्‍यमंत्री

पर्वरीतील गोळीबाराच्या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सरकार या प्रकरणी गंभीर असून हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून तुरुंगात पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT