Buimpal Accident Truck Dainik Gomantak
गोवा

Buimpal Accident: वळणावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा ताबा सुटला! भुईपाल येथे टेंपो भिंतीवर जाऊन आदळला

Buimpal News: वाळपईहून होंडाच्या दिशेने जाणारा टेम्पो (जीए ०३ -एन-४५९९) भुईपाल कॉलनी येथे पोचला असता अचानक रस्त्यावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा टेम्पोवरील ताबा सुटून अपघात घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: वाळपईहून होंडाच्या दिशेने जाणारा टेम्पो (जीए ०३ -एन-४५९९) भुईपाल कॉलनी येथे पोचला असता अचानक रस्त्यावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा टेम्पोवरील ताबा सुटून अपघात घडला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडला. सुदैवाने कोणालाही इजा झाली , मात्र वाहनाचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार हा टेम्पो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागासाठी कार्यरत असून कामगारांना घेऊन हा टेम्पो डिचोलीकडे जात होता. मात्र भुईपाल येथे एका छोट्या वळणावर अचानक गुरे आडवी आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व गुरांना वाचविताना हा टेम्पो सुमारे पंचवीस मीटर बाहेर जाऊन तुकाराम पिरणकर यांच्या संरक्षणभिंतीला धडकला.

यावेळी टेम्पोच्या केबिनमध्ये वाहनचालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी होते. तसेच मागील हौदात कामगार बसलेले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र यात वाहनाचे तसेच संरक्षण भिंतीचे बरेच नुकसान झाले आहे.

गोवा

मोकाट गुरांचा संचार वाढला

होंडा परिसरात मोकाट गुरांचा संचार वाढला असून ही गुरे वाहतुकीसाठी मोठी अडसर ठरत आहेत. यामुळे सतत छोटे मोठे अपघात घडत आहेत. पंचायतीने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

SCROLL FOR NEXT