Temperature  Dainik Gomantak
गोवा

तापमान वाढीमुळे गोवेकर होणार हैराण! हवामान खात्याचा अंदाज

गोव्याचे (Goa) तापमान वाढू लागले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासांच्या तुलनेत तापमानात अंदाजे 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन-चार दिवस तापमान वाढीमुळे गोवेकर हैराण होण्याची शक्यता आहे. (Goa Weather News)

गुरुवारी पणजीतील (Panaji) तापमान 32.6 डिग्री सेल्सियस आणि शुक्रवारी 32.5 डिग्री सेल्सियस होते. शनिवारी पणजीत कमाल तापमान 32.5 डि. से., तर किमान तापमान 21.00 डि. से. होते. राजधानी पणजीत 2009 साली सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद 39.2 डिग्री सेल्सियस एवढी झाली होती.

गोव्याचे (Goa) तापमान वाढू लागले आहे. राज्‍याच्‍या काही भागांमध्ये सकाळी कडक ऊन आणि रात्रीची थंडी पडते. त्‍यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवू लागल्‍या आहेत. आता शाळाही सुरू झाल्यामुळे मुलांना कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो. थंड पेय, शहाळे, विविध फळांचे ज्‍युस, लस्सी आदी पेयांकडे लोक वळू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT