KP Chowdary 
गोवा

KP Chowdary Death: प्रसिद्ध तेलगु चित्रपट निर्मात्याने गोव्यात संपवले जीवन, ड्रग्ज प्रकरणात झाली होती अटक

Telugu film producer KP Chowdary died in Goa: चौधरीकडून अमली पदार्थ घेणारे लोक सिनेसृष्टीत असल्याचा आरोप सायबराबाद पोलिसांनी केला होता.

Pramod Yadav

KP Chowdary Death News

पणजी: तेलगु चित्रपट निर्माता के. पी चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी यांनी गोव्यात आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. के. पी यांना एक वर्षापूर्वी अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर चौधरी खचले होते शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नामांकित वृत्तपत्राला दिली आहे.

प्रसिद्ध तेलगु चित्रपट 'कबाली'ची निर्मिती के. पी. चौधरी यांनी केली होती. २०१६ साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०२३ साली त्यांना सायबराबाद पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याजवळ ९३ ग्रॅम वजानाचे कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला होता.

चौधरीकडून अमली पदार्थ घेणारे लोक सिनेसृष्टीत असल्याचा आरोप सायबराबाद पोलिसांनी केला होता. यात तेलगु आणि तामिळ अभिनेते आणि अभिनेत्रींचा देखील समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

के. पी. चौधरी आणि एक नायजेरियन नागरिकाने त्यांच्या स्वत:च्या वापरासह मित्रांमध्ये देखील अमली पदार्थाचे वितरण केले. चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होते व येथेच त्यांनी क्लब देखील सुरु केला. पण व्यवसायात तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होते.

के. पी. चौधरी यांनी रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT