Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: बोगमाळो किनाऱ्यावर वाळूत अडकली तेलंगणातील आमदाराची कार...

कारवर विधानसभा सदस्य असल्याचे स्टीकर; पोलिसांनी ठोठावला दंड

Akshay Nirmale

Goa Beach: नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. यात काही पर्यटकांकडून नियम भंग होत असल्याचे समोर येत आहे. दाबोळी बोगमाळो समुद्र किनाऱ्यावर दुपारी एकाने आपली कार चक्क किनाऱ्यावर घातली. ही कार वाळूत रूतून बसली. याची माहिती स्थानिकांनी तत्ळाळ पोलिसांना दिली.

विशेष म्हणजे या कारवर विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार असल्याचे स्टीकर होते. ही फोर्ड कार तेलंगणातील असून टीएस 08 एफके 9786 असा या कारचा क्रमांक आहे. ही कार तेलंगणा राज्यातील आमदाराची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वास्को पोलिसांनी समुद्र किनार्‍यावर चारचाकी वाहन नेल्या प्रकरणी, तेलंगणा आमदाराच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढे बोगमाळो समुद्र किनार्‍यावर चारचाकी- दुचाकी वाहन घेऊन कोणी आढळल्यास, त्या वाहनावर पंचायत देखील कारवाई करेल, अशी माहिती चिकोळणा-बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले यांनी दिली आहे. पर्यटकांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून, समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही सरपंच महाले यांनी केले.

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर फक्त राज्य सरकारने नियुक्त केलेल्या जीव रक्षकांचेच वाहन नेता येते. ते देखील पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी तैनात असते. इतरांना समुद्र किनार्‍यावर वाहन चालविण्यास पूर्णपणे बंदी आहे. समुद्र किनार्‍यावर वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहन चालकावर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते.

बोगमाळो समुद्र किनार्‍यावरील आजच्या प्रकाराची माहिती सरपंच संकल्प महाले यांनी वास्को पोलिसांना कळवली. वास्को पोलिस स्थानकांचे उपनिरीक्षक गणेश मांतोडकर यांनी समुद्र किनार्‍यावर जाऊन वाळूत अडकलेल्या तेलंगणा राज्यातील वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहनाचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT