Tejashwi Yadav Dainik Gomantak
गोवा

Tejashwi Yadav: गोवा नव्हे बिहारमध्ये येतात सर्वाधिक पर्यटक! उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा दावा

बिहार हे महत्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्र असून, येथे बोधगया आहे. अनेक लोकांना ही पर्यटनस्थळे आकर्षित करत असतात.

Pramod Yadav

गोवा नव्हे तर बिहारमध्ये सर्वाधिक पर्यटक येतात असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी (Tejashwi Yadav) यादव यांनी केला आहे. तसेच, बिहारला पर्यटनात (Bihar Tourism) अधिक वाव असल्याचे वक्तव्य देखील यादव यांनी केले आहे.

दक्षिण आशियातील अनेक बौद्ध देशातील लोक बिहारला भेट देत असतात. खासकरण पिंडदान करण्यासाठी लोक येत आसतात. असेही यादव म्हणाले. राज्यात पर्यटनाला वाव असून येणाऱ्या पर्यटकांनी येथे अधिक वेळ व्यतित करावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले.

"बिहारमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे. गोव्यापेक्षा या राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मग ते 'पिंड दान' असो किंवा अनेक दक्षिण आशियाई बौद्ध देशांतून राज्याला भेट देणारे लोक असोत. राज्यात पर्यटक अधिकाधिक वेळ घालवतील यासाठी प्रयत्न करणे हे एक आव्हान सरकारसमोर आहे." तेजस्वी यादव म्हणाले.

बिहार हे महत्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्र असून, येथे बोधगया आहे. अनेक लोकांना ही पर्यटनस्थळे आकर्षित करत असतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत देखील याचा समावेश करण्यात आला आहे. बिहारच्या बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि नालंदा अवशेष यांचा युनेस्को जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

एका अहवालानुसार, 2019 मध्ये तब्बल 3.5 कोटी पर्यटकांनी बिहारला भेट दिली. 2001 मधील 85,673 पर्यटक संख्येवरून 2019 मध्ये ती 10.9 लाख झाली आहे. ही वाढ 12 पटीने झाल्याचा दावा राज्याच्या पर्यटन विभागाने केला आहे.

तर, गोव्यात (Goa Tourism) कोरोना संसर्गानंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी 81 लाख पर्यटक गोव्याला भेट देतील असे अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, 2019 मध्ये सुमारे नऊ लाख (0.9 दशलक्ष) आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि 72 लाख (7.2 दशलक्ष) देशांतर्गत पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT