Mining In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खनिजाचा 'ई लिलाव' लांबणीवर! 30 जानेवारीनंतर होणार प्रक्रिया; 173 कंपन्यांना स्वारस्य

Goa mineral e auction postponed: राज्यभरात १८ ठिकाणी हे हलक्या दर्जाचे खनिज साठवलेले आहे. ते खनिज खरेदी करण्यासाठी १७३ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

Sameer Panditrao

Goa mineral e-auction postponed

पणजी: तांत्रिक निविदांची तपासणी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणून खाण खात्याला साठवलेल्या खनिजाचा ई लिलाव पुकारणे पुढे ढकलावे लागले आहे. आता ३० जानेवारीनंतरच हा लिलाव पुकारला जाणार आहे.

राज्यभरात १८ ठिकाणी हे हलक्या दर्जाचे खनिज साठवलेले आहे. ते खनिज खरेदी करण्यासाठी १७३ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. आता चार टप्प्यांत हा लिलाव होणार आहे. आजपासून हा लिलाव सुरू होणार होता.

राज्य सरकारला लिलावासाठी ठेवलेल्या १८ ठिकाणच्या साठवलेल्या खनिजाच्या विक्रीसाठी १२५ निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र बोलीदारांना लिलावात सहभागी होता येईल. आता हा लिलाव ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

१८ ठिकाणी साठा

लिलावात सहभागी होण्यासाठी खाण कंपन्या आणि व्यापाऱ्यांसाठी किमान २५ कोटी रुपये निव्वळ मालमत्तेचे निकष ठेवले आहेत. या लिलावासाठी १८ ठिकाणी कमी दर्जाच्या लोह खनिजाच्या साठ्यात ३० दशलक्ष खनिज साठा आहे. उत्तर गोव्यात ३ तर दक्षिण गोव्यात १५ ठिकाणी हे साठवलेले खनिज आहे.

...तर सरकारला मिळणार प्रति टन २२ रुपये

राज्य सरकारने कमी दर्जाच्या लोह खनिजाचा पहिला लिलाव २२ टक्के राखीव किमतीवर करण्याचा निर्णय घेतला आहे. जर भारतीय खाण ब्युरोने कमी दर्जाच्या लोखंड खाणीसाठी प्रति टन किंमत १०० रुपये निश्चित केली असेल, तर खाण कंपन्यांना २२ रुपये प्रति टन राज्य सरकारला द्यावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

SCROLL FOR NEXT