Ravindra Bhavan Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa: मडगावात इफ्फीची तयारी सुरू; तांत्रिक अधिकाऱ्यांकडून मडगाव रवींद्र भवनची पाहणी

IFFI: रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सर्व तियात्र निर्माते व दिग्दर्शकांची बैठक बोलावून त्यांना या संदर्भात सूचना केल्या

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यंदा या महोत्सवाचा एक भाग असलेल्या मडगाव रवींद्र भवनची गोवा मनोरंजन सोसायटी तसेच इफ्फीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही सूचनाही करण्यात आल्या. त्यानुसार तियात्रिस्ट सभागृहाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे हे सभागृह तियात्र तसेच इतर कार्यक्रमांसाठी बंद ठेवावे लागणार आहे.

रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सर्व तियात्र निर्माते व दिग्दर्शकांची बैठक बोलावून त्यांना या संदर्भात सूचना केल्या. यावेळी काही जणांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तियात्रांसाठी सभागृह उपलब्ध करावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, यंदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील काही चित्रपट येथे प्रदर्शित केले जातील.

चित्रपटासाठी पडदा, प्रोजेक्टर, नवी ध्वनी योजना यात सुधारणा केली जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी ध्वनी योजना बसवली जाईल. त्यामुळे चित्रपटांबरोबर नाटक, तियात्र किंवा संगीत कार्यक्रमासाठी सुद्धा ही योजना उपयुक्त ठरेल असेही तालक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT