Mumbai-Goa Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express: दीड तास उशीराने धावली मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस; प्रवाशांचा खोळंबा

Mumbai-Goa Vande Bharat Train: दीवा येथे आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे एरव्ही पनवेलमार्गे धावणारी ट्रेन कल्याणमार्गे वळवण्यात आली.

Pramod Yadav

Mumbai-Goa Vande Bharat Express

मुंबई: तांत्रिक अडचणीमुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुमारे दीड तास उशीराने धावली. दीवा स्थानकाजवळ आलेल्या तांत्रिक अडचणीचा सोमवारी (२३ डिसेंबर) सबअर्बन ट्रेन वाहतुकीसह मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस फटका बसला. ट्रेनला ८७ मिनिटे विलंब झाल्याने ही ट्रेन नंतर कल्याणमार्गे वळवण्यात आली.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस पहाटे ५.२९ वाजता सुटली खरी पण ठाणे स्थानक ओलंडल्यानंतर ट्रेनला तांत्रिक अडणीचा सामना करावा लागला. सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिवा येथे आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे एरव्ही पनवेलमार्गे धावणारी ट्रेन कल्याणमार्गे वळवण्यात आली. यामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ८७ मिनिटे विलंब झाला.

गेल्या वर्षी मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आली. या ट्रेनचा प्रवास साधारपणे सात तास ४५ मिनिटात पूर्ण होतो. दरम्यान, सोमवारी ट्रेनला दीड तासांचा विलंब झाल्याने ट्रेन उशीराने गोव्यात दाखल झाली. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.

मुंबई-गोवा (मडगाव) वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावते. एक्सप्रेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार चालते. प्रवासादरम्यान ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबा घेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT