Tillari Dam News google image
गोवा

Tillari Dam: तिळारीतून पाण्यासाठी गोव्याला अजून एक दिवस वाट पाहावी लागणार, रविवारी मिळणार पाणी

तांत्रिक अडचणीमुळे कालव्यात पाणी सोडण्यासाठी विलंब होत आहे.

Pramod Yadav

Tillari Dam: तिळारी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने गोव्याला आजपासून (शनिवार) पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, धरणाच्या गेटजवळ तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आलीय.

कालव्यात पाणी सोडण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तिळारीतून पाण्यासाठी गोव्याला अजून एक दिवस वाट पाहावी लागणार आहे.

तिळारी धरणाचे पाणी शनिवारपासून (ता.23) मिळणे सुरू होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली होती. कालव्यांची दुरुस्ती झाली असून आपण कामाची पाहणी केली आहे. शनिवारी सकाळी तिळारी धरणातील पाणी कालव्यातून गोव्यासाठी सोडले जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

मात्र, गेटजवळ झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे कालव्यात पाणी सोडण्यासाठी विलंब होत आहे.

तिळारी धरणाचे पाणीच उत्तर गोव्याची तहान भागवते. धरण झाल्यापासून उत्तर गोव्याला पाण्याची टंचाई जाणवलेली नाही. धरणाचे कालवे 35 वर्षे जुने झाल्याने त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे 27 नोव्हेंबरला तिळारीतून येणारे पाणी बंद करून कालव्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली, ती पूर्ण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

Arshdeep Singh: बुमराह-चहलला जमलं नाही, ते अर्शदीप करणार! T20 मध्ये करणार शतक, 'हा' पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनेल

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

SCROLL FOR NEXT