Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव द्यावा : सुभाष शिरोडकर

Goa News : दिगास-पंचवाडी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोबोटिक कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : कुडचडे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील प्रतिभा अचूक हेरून त्यांना आवश्यक शिक्षणाकडे वळवावे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवतात, असे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

दिगास-पंचवाडी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोबोटिक कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गोवा सरकारचे संकल्प प्रकल्प संचालक विजय बोर्जेस, यंत्रमानव अभियंता कशीष प्रभुदेसाई, अभियंते सचिन शिरोडकर,

प्रा. सिया गुडे, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दामोदर पार्सेकर, खजिनदार राया देसाई, व्यवस्थापक संतोष भांगी, सहखजिनदार गिरीश भांगी, मुख्याध्यापिका विद्या विर्नोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आकाशात झेप घेण्याची जिद्द बाळगावी येत्या दहा-पंधरा वर्षांत शिक्षणामध्ये मोठे बदल घडून येतील.

दरवर्षी गोव्यात पंचवीस हजार विद्यार्थी शालान्त परीक्षेला बसतात. त्यातील केवळ पाच हजार विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश मिळवतात तर दीड हजार विद्यार्थी तंत्रज्ञान विभाग निवडतात, असे सुभाष शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT