Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता : डॉ.सुजाता कदम

Pernem News : संत आंबिये महाविद्यालयात कार्यशाळा

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगवेगळी आणि भिन्न असते. त्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असते.

विद्यार्थ्यांच्या अंगची क्षमता ओळखण्यासाठी शिक्षकाला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण अशा प्रशिक्षणातूनच शिक्षक अधिक गतिमान होऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखू शकतो, असे प्रतिपादन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गोवाच्या डीन डॉ.सुजाता कदम यांनी केले.

संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय विर्नोडा-पेडणे येथे आयोजित कार्यशाळेत त्या प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होत्या. यावेळी प्राचार्या डॉ. प्रवीणा केरकर, उपप्राचार्या ल्युसी जेम्स, डॉ.किशोर शहा, कार्यशाळेचे मुख्य संयोजक अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ही दोन दिवसीय कार्यशाळा संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय व आयडियाज अनलिमिटेड आणि मॅनेजिंग ट्रस्टी जीडीपी फाउंडेशन, पुत्झमेस्टर काँक्रिट प्रायव्हेट लिमिटेड, वेर्णा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.८ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.

सर्टिफिकेट कोर्स वर्कशॉप इन असिसमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर हा या कार्यशाळेचा विषय होता. या कार्यशाळेत आयडियाज अनलिमिटेड आणि मॅनेजिंग ट्रस्टी जीडीपी फाउंडेशनचे संचालक डॉ. किशोर शहा यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांना विविध उद्योग, कंपन्या यामध्ये करियरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा.ॲण्ड्रू गोम्स यांनी आभार मानले.

‘शिक्षण धोरण’ अंमलबजावणीसाठी कार्यशाळा : प्राचार्य केरकर

विद्यार्थ्यांच्या अद्वितीय क्षमता ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि नंतर या क्षमतांचे रूपांतर नोकरी कौशल्ये, जीवन कौशल्ये, चारित्र्य आणि राष्ट्र उभारणीसाठी करणे हे नवे ‘शैक्षणिक धोरण २०२०’चे सार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण संचालनालय आघाडीवर आहे आणि संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय विर्नोडा मधील मूल्यांकन प्रयोगशाळा नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीचा भाग आहे.

त्यासाठीच या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते, अशी माहितीसप्राचार्या डॉ प्रवीणा केरकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT