Census work for teachers Dainik Gomantak
गोवा

Teachers Extra Work: शिक्षकांवर जनगणना कामाचा बोजा! शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्‍याची भीती; वर्तुळातून नाराजी व्यक्त

Census work for teachers: नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असताना शिक्षकांवर जनगणना कामाचा अतिरिक्त बोजा टाकण्याचा निर्णय घेतल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: नवीन शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर असताना शिक्षकांवर जनगणना कामाचा अतिरिक्त बोजा टाकण्याचा निर्णय घेतल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

‘एन्युमरेटर’ व ‘सुपरवायझर’ म्हणून नियुक्त शिक्षकांची करण्यासाठी माहिती मागविण्यात आल्याने शाळांच्या नियमित शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्‍यात नवीन शैक्षणिक धोरणाअन्वये नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

या धोरणामुळे अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि अध्यापन पद्धतींमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त नियोजन, प्रशिक्षण आणि तयारीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना जनगणनेच्या कामात गुंतविण्याचा निर्णय योग्य नसल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मामलेदार कार्यालयाने ४ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार जनगणना विभागासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या पत्रात मुख्याध्यापकांसह नियमित नियुक्त शिक्षकांची यादी ६ मार्चपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. या घाईगडबडीच्या प्रक्रियेबद्दलही शिक्षकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत शिक्षण विभागाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र शिक्षकांना इतर कामांत गुंतविण्याच्‍या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

कुत्र्यांची मोजदाद करायलाही लावतात!

काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, ‘‘कधी कुत्र्यांची मोजदाद, कधी निवडणूक, तर कधी जनगणना... शिक्षक हा सर्वच कामांसाठी सहज उपलब्ध मनुष्यबळ म्हणून वापरला जातो. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार कोण करणार?’’

शिक्षणतज्ज्ञ काय म्‍हणतात?

एनईपीच्‍या अंमलबजावणीमुळे कौशल्याधारित शिक्षण, सतत मूल्यमापन, शिक्षक प्रशिक्षण आणि नवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब यासाठी शिक्षकांना अधिक वेळ देणे आवश्यक आहे. अशा वेळी वर्गाबाहेरील प्रशासकीय कामांचा ताण वाढल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

जनगणना किंवा निवडणुका यांसारखी कामे महत्त्वाची असली तरी त्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. शिक्षकांचा वेळ मुख्यतः अध्यापन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला गेला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्यक्त केले आहे.

शिक्षकांसमोरील तातडीची कामे

दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणे

निकाल प्रक्रिया, अहवाल तयार करणे

प्रगती पुस्तके तयार करणे

नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT