Tea vendor From Bengaluru wins 25 lakh at Goa casino, loses 15 lakh to kidnappers Dainik Gomantak
गोवा

बेंगळुरूच्या चहावाल्याचे नशीब फळफळलं ; गोव्याच्या कॅसिनोत जिंकले 25 लाख पण घरी जाताच झालं किडनॅपिंग

चहावाला त्याच्या मूळ गावी जाताच त्याच्यासोबत मोठी घटना घडली आणि त्याने 15 लाख रूपये गमावले.

Pramod Yadav

Tea vendor From Bengaluru wins 25 lakh at Goa casino, loses 15 lakh to kidnappers: आयुष्यात एकदा तरी कॅसिनोत जाऊन पैसे जिंकावे अशी अनेकांची इच्छा असते. अशीच इच्छा बेंगळुरूच्या एका चहावाल्याची होती. तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तो चहा विकून कमावलेले चार लाख रूपये घेऊन गोव्यात आला.

मांडवी किनारी असलेल्या एका कॅसिनोत खेळून त्याने तब्बल 25 लाख रूपये जिंकले. कॅसिनो व्यवस्थापनाने जिंकलेले पैसे त्याच्या खात्यात जमा देखील केले. पण, चहावाला त्याच्या मूळ गावी जाताच त्याच्यासोबत मोठी घटना घडली आणि त्याने 15 लाख रूपये गमावले.

द न्यू इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टिळक मणिकांत असे या व्यक्तीचे नाव आहे. मणिकांत 30 जुलै रोजी आपल्या मित्रांसह गोव्यात एका कॅसिनोत आला. कॅसिनोत त्याने खेळून तब्बल 25 लाख रूपये जिंकले. पैसे घेऊन मणिकांत माघारी त्याच्या गावी गेला, तेव्हा त्याच्या ओळखीच्या काही लोकांनी त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी मणिकांताचा फोन हिसकावून 15 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले.

पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा मोबाईल परत केला आणि पोलिसात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन त्याला शहराच्या बाहेर सोडले. 05 आणि 06 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली.

मणिकांताने गुन्हा दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. मणिकांताने कॅसिनोत 25 लाख रुपये जिंकल्याची बातमी सर्वत्र पसरली. तो 4 ऑगस्टला त्याच्या मित्रांसह बंगळुरूला परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमंतनगर येथील एका बेकरीसमोर उभा असताना कारमधून काही लोक आले आणि त्याचे अपहरण केले.

निर्जनस्थळी घेऊन गेल्यानंतर त्याच्या मोबाईल मधून जबरदस्ती 15 ट्रान्सफर केले. पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देत काठ्यांनी त्याला मारहाण केली.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, कार्तिक, पांडू, ईश्वर आणि निश्चल अशी संशयितांची नावे समोर आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

Dhirio in Goa: ‘धीरयो’वरून सरकार पेचात! परंपरा की कायदा? आता न्‍यायालयात ‘कसोटी’

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT