Tea Price Hike  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सामान्यांचे 'अमृत' चहाही महागण्याचे संकेत

राज्यात दूध दरवाढ लागू: फुल क्रीम 5 रुपये, तर इतर दूध 4 रुपयांनी वधारले

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

पणजी: राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर गोवा दूध डेअरीने दूध दरांमध्ये प्रतिलिटर 4 आणि फुल क्रीम दुधासाठी 5 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांबरोबरच हॉटेल आणि मिठाई व्यावसायिक भरडले जाणार आहेत. यामुळे सामान्यांचे अमृत समजला जाणारा चहाही महागण्याचे संकेत मिळत आहेत.

ही दरवाढ आज सोमवार, 2 मे पासून लागू होणार होती. मात्र, त्यापूर्वी रविवारपासूनच ती लागू करत असल्याचे परिपत्रक गोवा डेअरीचे विशेषाधिकारी काशी नाईक यांनी काढलेल्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच आता दूध दरवाढीने नागरिकांना चटका दिला आहे. जनावरांसाठी लागणारे खाद्य आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढीची आवश्यकता होती. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दूध दरवाढीला परवानगी दिली. त्यानुसार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गोवा डेअरीला प्रतिलिटर चार रुपये दुधाचा दर वाढवण्यास परवानगी दिली होती.

दुग्धजन्य पदार्थांचे दरही वधारणार

या दरवाढीमुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मिठाईसाठी दूध मोठ्या प्रमाणात लागते. प्रामुख्याने दुधाचा वापर चहासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक, स्टॉलधारक यांनाही चहाची दरवाढ करावी लागणार आहे.

दूध पिशवीवर जुनेच दर

गोवा डेअरीच्या दुधाच्या चार प्रकारांपैकी तीन प्रकारांमध्ये प्रतिलिटर 4 रुपये आणि फुल क्रीम दुधासाठी 5 रुपये दर वाढवले आहेत. त्याची अंमलबजावणी रविवारपासूनच सुरू झाली. मात्र, गोवा डेअरीने दूध पिशवीवर जुनेच दर छापल्यामुळे ग्राहक, विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

अडीच लाख दुधाची गरज: राज्याला दररोज अडीच लाख दुधाची गरज असून गोवा डेअरी केवळ 50 ते 52 हजार लीटर दुधाचे संकलन करून वितरण करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

SCROLL FOR NEXT