Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Carambolim Mega Project: करमळीतील ‘तो’ प्रकल्‍प थांबवणार! मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍‍वासन; काम थांबवण्‍याचा आदेश होणार जारी

CM Pramod Sawant: मुख्‍यमंत्री सावंत यांनी ‘प्रकल्‍पास नोटीस पाठवून पुढील काळात काम थांबवण्‍याचा आदेश जारी करण्‍यात येईल’, असे रात्री जाहीर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: करमळी येथील प्रस्तावित मेगा प्रकल्पविरोधात करमळीवासीयांबरोबर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर यांनी पाटो-पणजी येथील नगरनियोजन खात्याच्या (टीसीपी) कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर मुख्‍यमंत्री सावंत यांनी ‘प्रकल्‍पास नोटीस पाठवून पुढील काळात काम थांबवण्‍याचा आदेश जारी करण्‍यात येईल’, असे रात्री जाहीर केले.

प्रकल्पाची मंजुरी रद्द करा, अशी मागणी आंदोलकांची राहिली. कार्यालय बंद होण्याच्या वेळी सायंकाळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. पोलिसांनी कार्यालय इमारतीचा ताबा घेतल्याने आंदोलनकर्त्यांना मुख्य नगरनियोनकारांना भेटण्यास दिले गेले नाही.

सायंकाळी उशिरा त्यांना भेटण्यास संधी दिली; पण प्रकल्प रद्दवर निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडला होता. बोरकर यांन सांगितले की, करमळीत ८४ सदनिकांची इमारत उभारली जाणार आहे.

त्यात ४६ दुकानेही असतील. प्रकल्प उभारला गेल्यास करमळी गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल. दरम्यान, या प्रकल्पामुळे गावाची पारंपारिक जीवनशैली बाधित होईल. तसेच, या प्रकल्पाच्या कामामुळे वाहतुकीवर ताण, ध्वनी आणि प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे, असाही दावा करण्यात आला.

कोणतेही उल्लंघन नाही : टीसीपी

करमळी मेगा प्रकल्प परिसराची नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी तथा पाहणी अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार कोणतेही उल्लंघन झालेले नाही. सर्व नियम व अटींचे पालन झाल्याचे मुख्य नगरनियोजक वर्तिका डागर यांनी भेटण्यास गेलेल्या आमदार बोरकर यांना सांगितले.

मी नगर नियोजनमंत्री राणे यांच्याशी चर्चा केली असून, आमदार बोरकर यांना कळविले आहे की, करमळी येथील संबंधित प्रकल्पास नोटीस जारी करण्यात येईल. तसेच येत्या तीन दिवसांत होणाऱ्या नगर व ग्राम नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश जारी करण्यात येईल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT