Goa Taxi App Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: 'ॲप आधारित टॅक्‍सी सेवा नको'! पारंपरिक टॅक्सीमालकांची मागणी; मुख्‍यमंत्र्यांनी घेतली प्रतिनिधींसोबत बैठक

Goa Taxi App Protest: डिजिटल टॅक्‍सी धोरणाला मंजुरी देण्‍याबाबत सरकारने वाहतूक खात्‍याचे तीन अधिकारी आणि टॅक्‍सी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांची समिती स्‍थापन केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: डिजिटल टॅक्‍सी धोरणाला मंजुरी देण्‍याबाबत सरकारने वाहतूक खात्‍याचे तीन अधिकारी आणि टॅक्‍सी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांची समिती स्‍थापन केली आहे. या समितीची येत्‍या सोमवारी बैठक होणार असून, या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दहा दिवसांत त्यांचे प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मात्र, ॲप आधारित टॅक्सी सेवेत न जाण्याचा निर्णय पारंपरिक टॅक्सीमालकांनी घेतल्याने हा विषय ‌‍अधिवेशन काळात पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅक्‍सी संघटनांच्‍या प्रमुख प्रतिनिधींसोबत गुरुवारी घेतलेल्‍या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतान‍‍ा मुख्यमंत्री म्हणाले, टॅक्‍सीचे दर नियंत्रणात असावेत. राज्‍यात सुरक्षित आणि पारदर्शक टॅक्‍सी व्‍यवसाय चालावा आणि त्‍याचा टॅक्‍सीमालकांसह प्रवासी आणि पर्यटकांनाही फायदा मिळावा, यासाठी सरकार डिजिटल टॅक्‍सी धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचा विचार करीत आहे.

त्‍याच अनुषंगाने टॅक्‍सी संघटनांच्‍या प्रमुख प्रतिनिधींशी बैठक घेतली असून त्‍यांना डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर येण्‍याची विनंती केली आहे. बैठकीला उपस्‍थित प्रतिनिधींनी सरकारच्‍या भूमिकेबाबत सकारात्‍मकता दर्शविली आहे.

त्‍यामुळे वाहतूक खात्‍याचे तीन अधिकारी आणि टॅक्‍सी संघटनांच्‍या प्रतिनिधींची समिती स्‍थापन केली आहे. या समितीची येत्‍या सोमवारी पुन्‍हा बैठक होईल.

त्‍यात टॅक्‍सी संघटनांच्‍या इतर मागण्‍या जाणून घेतल्‍या जातील आणि त्‍या टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सोडवल्‍या जातील, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सोमवारच्‍या बैठकीत निघणार तोडगा

पारंपरिक टॅक्‍सीमालकांचे प्रश्‍‍न सोडवण्‍याच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्‍सी संघटनांच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. राज्‍यात सध्‍या गोवा माईल्‍स आणि गोवा टॅक्‍सी अशा दोन ॲप आधारित सेवा सुरू असून यापुढेही सुरू राहतील.

पुढील काळात या व्‍यवसायात सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्‍यासाठी डिजिटल टॅक्‍सी धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोमवारच्‍या बैठकीत त्‍यावर निश्‍चित तोडगा निघेल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी सांगितले.

ॲप आधारित सेवा नको

आजच्‍या बैठकीत डिजिटल टॅक्‍सी धोरणाच्‍या अनुषंगाने चर्चा झाली; परंतु आम्‍हाला ॲप आधारित टॅक्‍सी सेवा नको आहे. आम्‍हाला अशा सेवेत सहभागी व्‍हायचे असते तर आठ वर्षांपूर्वीच झालो असतो; पण आम्‍हाला अशी सेवा नको आहे.

त्याऐवजी अंतरानुसार सरकारने टॅक्‍सीचे दर निश्‍चित करावेत, अशी आमची मागणी असून सोमवारच्‍या बैठकीत आम्‍ही त्‍यावर चर्चा करू, असे टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी चेतन कामत म्‍हणाले. आजच्‍या बैठकीला काही प्रतिनिधी उपस्‍थित नव्‍हते. त्‍यांच्‍याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT