Taxi
Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: एक रुपयाही न खर्चता बेरोजगारांना टॅक्सी

दैनिक गोमन्तक

Goa Taxi: राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवा उद्योजक अथवा वाहतूक उद्योजक योजना लवकरच सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गोवा माईल्सकडून युवकांना अगदी एक रुपयाची गुंतवणूक न करता टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मदत केली जाणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

युवा उद्योजक अथवा वाहतूक उद्योजक योजना ही बेरोजगारांसाठी सुरू केली आहे. त्याची तयारी झाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उद्‍घाटन केले जाईल.

या टॅक्सी ॲप सेवेसाठी युवकांना कोणतीच रक्कम वा डाऊन पेमेंट गुंतवावे लागणार नाही. गोवा माईल्स युवकांना स्वतःचे भांडवल वापरून टॅक्सी उपलब्ध करून देणार आहे. ही योजना ॲप आधारित आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

बॅज, परवान्याचीही गरज नाही

या योजनेचा फायदा घेणाऱ्यांसाठी टॅक्सी चालवण्याचा बॅज असण्याचीही सक्ती नाही. तसेच त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा, असेही नाही. कोणीही गोमंतकीय गोवा माईल्सद्वारे नोंदणी करून हा व्यवसाय सुरू करू शकतो.

टॅक्सी घेण्यासाठी सुरुवातीला जी रक्कम जमा करावी लागते, तीसुद्धा जमा करण्याची गरज नाही. ती रक्कम गोवा माईल्सच जमा करणार आहे. व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला की गोवा माईल्स ही सुरुवातीची रक्कम तसेच गाडीचा हप्ता हळूहळू त्यातून वजा करून घेईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT