Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सी चालकांची मुजोरी; मुरगाव बंदरात अमेरिकन पर्यटकांची केली अडवणूक, जाणून घ्या नेमका प्रकार...

पर्यटकांना न्यायला आलेल्या खासगी बसेस अडवल्या

Akshay Nirmale

Goa Taxi: गोव्यात टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातून प्रवासांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. आताही चक्क अमेरिकन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार घडून आला आहे. त्यामुळे पर्यटकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मुरगाव बंदरात नुकतेच पर्यटकांचे एक क्रुझ शिप दाखल झाले होते. त्यातून आलेल्या अमेरिकन पर्यटकांना बंदरातून शहरात नेण्यासाठी खासगी बसेसची सेवा घेतली जात असते. तशी सेवा या अमेरिकन पर्यटकांनी घेतली होती. तथापि, येथील मुजोर टॅक्सी चालकांनी या खासगी बसेस अडवून ठेवल्या आणि त्यांची टॅक्सी वापरण्याबाबत सक्ती केली.

क्रुझ ऑपरेटर्सच्या माहितीनुसार या अमेरिकन प्रवाशांना टॅक्सी चालकांकडून अक्षरशः हीन वागणूक देण्यात आली. या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसमोर टॅक्सी चालकांनी त्यांच्या टॅक्सीतून प्रवास करण्याचा पर्याय ठेवला. अमेरिकन प्रवाशांनी वारंवार सांगुनही टॅक्सी चालक ऐकायला तयार नव्हते. टॅक्सी चालकांच्या अशा मुजोर वागण्याने या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सोसावा लागला.

दरम्यान, टॅक्सी चालकांच्या या वागणुकीचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. सरकारने अशा टॅक्सी चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सरकारने असे प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, याचा थेट संबंध गोव्याच्या प्रतिमेशी आहे. टॅक्सी चालकांच्या अशा वागण्याने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. पर्यटन राजधानी म्हणून असलेल्या गोव्याची नकारात्मक ओळख यातून बनण्याची शक्यता असल्याने असले प्रकार वेळीच रोखले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT