Goa Taxi Drivers Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यातील तारांकित हॉटेल्‍स बाहेर Goa Miles ची लुडबूड खपवून घेणार नाही; केळशी टॅक्‍सीचालकांचा इशारा

Goa Taxi Drivers: हॉटेल्‍सचे कर्मचारी मुद्दामहून गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकांना पर्यटकांना घेऊन जाण्‍यासाठी फोन करतात

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील किनारपट्टी भागात जी तारांकित हॉटेल्‍स आहेत, त्‍या हॉटेल्‍सच्‍या टॅक्‍सीस्थानकांवर गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकांनी लुडबूड केल्‍यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा केळशी येथील टॅक्‍सीचालकांनी दिला.

काही हॉटेल्‍सचे कर्मचारी मुद्दामहून गोवा माईल्‍स टॅक्‍सीचालकांना पर्यटकांना घेऊन जाण्‍यासाठी फोन करतात, हे प्रकारही बंद हाेण्‍याची गरज यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आली. केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांच्‍याबरोबर आज या टॅक्‍सीचालकांची बैठक झाली. यावेळी गोवा माईल्‍सच्‍या टॅक्‍सीमुळे स्‍थानिक टॅक्‍सीचालकांचा धंदा बुडतो, अशी तक्रार करण्‍यात आली.

यावेळी सरपंच वाझ यांनी, विमानतळावरून पर्यटकांना हॉटेलपर्यंत आणून सोडण्‍यास गोवा माईल्‍स चालकांना कुणीही अडवत नाहीत. मात्र, ते आपल्‍या गाड्या हॉटेल्‍सच्‍या आसपास पार्क करून ठेवतात आणि हॉटेल्‍समध्‍ये राहणाऱ्या पर्यटकांची भाडी घेतात, हे प्रकार बंद झाले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT