Mopa Airport news Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: टॅक्सी कोण चालवणार यावरून वादावादी, मोपा विमानतळावर तरुणाला मारहाण; दोन्ही चालकांना अटक

Taxi driver dispute Goa: टॅक्सी व्यवसायाच्या वादातून झालेल्या भांडणात २८ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली

Akshata Chhatre

मोपा: पेडण्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यवसायाच्या वादातून झालेल्या भांडणात २८ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कारवाई करत मोपा विमानतळ पोलिसांनी पेडण्यातील दोघा रहिवाशांना अटक केली आहे.

पेडण्यातील नागझर येथील रहिवासी हाशिम अन्सारी यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. हाशिम यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार मनोज आणि हर्षल हे दोघे पेडणे आणि वझरी येथील रहिवासी आहेत.

त्यांनी टॅक्सी व्यवसायाच्या वादात अन्सारी यांना शिवीगाळ केली तसेच शारीरिक हल्ला चढवत जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार,पेडण्यात नव्याने सुरु झालेल्या मोपा विमानतळावर टॅक्सी चालवण्यावरून झालेल्या मतभेदामुळे हा वाद झाला होता. या वादाचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

अन्सारीच्या तक्रारीनंतर, मोपा विमानतळ पोलिसांनी प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि अपमानास्पद भाषेचा वापर यासंबंधी भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांखाली तक्रार नोंदवली आहे आणि सध्या शशांक परब या घटनेची सखोल तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT