Madgaon Municipal Concil Dainik Gomantak
गोवा

संगणक प्रणाली बंद असल्याने मडगाव पालिकेत करदात्यांचा खोळंबा

अंदाजपत्रक अपडेट न केल्याने घोळ, दुपारी अडीचनंतर कामकाजाला सुरुवात

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकाच्या नोंदी संगणक प्रणालीत अपडेट न केल्याने आज मडगाव पालिकेत कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचा पूर्ण दिवस खोळंबा झाला. ऑनलाइन कर भरण्याची प्रकिया त्यासाठी सुरू करता न आल्याने सकाळपासून कर भरण्यास आलेल्या नागरिकांना दुपारपर्यंत ताटकळत थांबावे लागले.

मडगाव (Madgaon) पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना यासंबंधी विचारले असता दुपारी अडीचनंतर ही सेवा सुरू झाली, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अंदाजपत्रकाच्या नोंदी अपडेट करण्यासाठी एक पूर्ण सत्र लागत असल्याने सकाळी ही सेवा सुरु करता आली नाही, असंही त्यांनी सांगितले. मात्र अशी परिस्थिती असल्यास पालिकेने लोकांना ही गोष्ट आधीच का कळविली नाही, असा सवाल संतप्त नागरिकांनी (Citizens) केला आहे.

मडगाव पालिकेबाहेर हा कर भरण्यासाठी काहीजण सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत होते. अशा नागरिकांनी पालिकेच्या हलगर्जीपणा बद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. संगणकावर (Computer) नोंद होत नसेल लोकांकडून पैसे वसूल करुन नंतर त्या नोंदी अपलोड करता आल्या नसत्या का असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. मात्र तशी व्यवस्था नसल्याचं स्पष्टीकरण देत पालिकेचे सहाय्यक लेखाधिकारी अभय राणे यांनी आपली असमर्थता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'गोव्याचे लोक मला ओळखतात', ढवळीकरांनी दिली प्रतिक्रिया; पूजा नाईकच्या आरोपांवर नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

"त्याला संघात का घेतलं?" टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला, 'या' खेळाडूला वगळल्याने नाराजी

Jasprit Bumrah Record: W,W,W,W,W... 'बुमराह एक्स्प्रेस' सुसाट! आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनला टाकलं मागे Watch Video

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

Pooja Naik: "नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही", आरोपी पूजा नाईकचा मोठा खुलासा; तपासाची दिशा बदलली

SCROLL FOR NEXT