Mopa Airport Project
Mopa Airport ProjectDainik Gomantak

मोपा लिंक रोड प्रकरणावर 4 एप्रिलला अंतिम सुनावणी

न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच रस्त्याचं कामही सुरुच असल्याचं चित्र
Published on

पणजी : मोपा लिंक रोड प्रकरणात आता 4 एप्रिल रोजी अंतिम निकाल दिला जाणार आहे. मोपा लिंक रोड बांधकामाविरोधात एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच रस्त्याचं काम सुरुच असल्याचं चित्र आहे. नवीन सरकार आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल या आशेत लिंक रोड प्रकल्पबाधित हतबल झाल्याचं चित्र आहे.

Mopa Airport Project
गोव्याच्या मंत्रिमंडळात दामू नाईकांना मंत्रिपद मिळणार?

मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्ग ते मोपा विमानतळ (Mopa Airport) या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सरकारने मागच्याच वर्षी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा करत काही पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आता 4 एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

Mopa Airport Project
काणकोण पालिकेला मिळणार नवी इमारत!

दरम्यान याआधी मोपा (Mopa) लिंक प्रकरणात स्थानिक शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. रस्त्यासाठी होणारी झाडांची कत्तल रोखण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. मात्र आंदोलक शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन प्रशासनाने मोठा फौजफाटा लावत रस्त्याचं काम सुरुच ठेवलं होतं. वारखंडचे सरपंच संजय तुळसकर यांच्या नेतृत्वाखालील पंचायत मंडळाने मोपा लिंक रोड करणाऱ्या कंत्राटदाराला लेखी नोटीस पाठवून काम बंद करण्याचा आदेश (Order) दिला होता. परंतु कंत्राटदाराने पंचायतीच्या आदेशाला पंचायत संचालनालयाकडे आव्हान देत स्थगिती मिळवली होती. त्यामुळे आता कोर्ट 4 एप्रिलला काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com