Casinos in Goa and Sikkim under DGGI scanner
गोवा, सिक्कीममधील अनेक कॅसिनो GST इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (DGGI) स्कॅनरखाली असून, त्यांच्यावर 10,000 कोटी रूपये कर चुकविल्याचा आरोप करण्यात आला आहे. महासंचालनालयामार्फेत सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
एका हिंदी वृत्त वाहिनेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 28 टक्के ऐवजी 18 टक्के कमी दराने चुकीचे GST पेमेंट आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा गैरवापर. या दोन गोष्टींवर DGGI चा तपास केंद्रित आहे.
दरम्यान, कॅसिनोद्वारे भरला जाणाऱ्या कराचा वाद कायद्यातील स्पष्टतेच्या अभावामुळे उद्भवला आहे. काही आस्थापनांनी कायद्यातील संदिग्धतेचा फायदा घेत 18 टक्के कमी दराने जीएसटी भरला.
नुकत्याच जीएसटी कौन्सिलच्या झालेल्या 50 व्या बैठकीनंतरच कॅसिनोसाठी कर दर निश्चित करण्यात आला. हा कर 8 टक्के करण्यात आला. पण, यापूर्वीच अनेक कॅसिनो GST इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या स्कॅनरखाली होते.
डेल्टा कॉर्प ही देशातील एकमेव सूचीबद्ध कॅसिनो गेमिंग कंपनी आहे. कंपनी इंट्रा-डे उच्चांकावरून तीन टक्क्यांहून अधिक घसरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.