Vijay Kenkre, Kala Academy Canva
गोवा

Kala Academy: कला अकादमीच्या 'उणिवांकडे' लक्ष देणे महत्वाचे की 'इगो' कुरवाळणे?

Kala Academy Task Force: टास्क फोर्सच्या कालच्या मीटिंगनंतर विजय केंकरे यांनी, ‘कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी जे काम केले गेले आहे ते काम पस्तीस टक्के मार्क मिळवण्यासाठी देखील पुरेसे नाही’ हे सांगून 'सरकारी' बाजूची हवा काढून घेतली आहे. पस्तीस टक्के ही मार्क न मिळवणाऱ्या नापास कला अकादमीच्या नाट्यगृहात आता ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धा होऊ घातली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Kankare's Task Force Inspection Reveals Defects in Renovated Kala Academy

कला अकादमीच्या नूतनीकरणात जो घोळ घातला गेला आहे आणि त्यातून कला अकादमीची इमारत व त्यातील नाट्यगृहे यांचे जे नुकसान करण्यात आले आहे त्याविरुद्ध गोव्यातील कलाकारांनी, रसिकांनी आणि एकंदरच कला अकादमीबद्दल आस्था असणाऱ्यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला आणि सरकारच्या भूमिकेबद्दल‌ ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनाही जाहीर करावे लागले होते, ‘हो. कला अकादमीच्या नूतनीकरणात बऱ्याच त्रुटी राहून गेल्या आहेत.’ या सर्वांची परिणती म्हणून कला अकादमीच्या वास्तुत असलेल्या त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष 'टास्क फोर्स'ही स्थापन केला.

परवा या टास्क फोर्सने पहिल्यांदा कला अकादमीच्या वास्तूची पाहणी केली आणि त्यानंतर कमाल म्हणजे पत्रकारांशी बोलताना या टास्क फोर्सचे अध्यक्ष, प्रख्यात नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांनी, ‘कला अकादमीच्या नूतनीकरणात राहिलेल्या समस्या या किरकोळ आहेत आणि त्या दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत’ हे विधान केले होते.

त्यांचे हे विधान सार्वत्रिक झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या त्रुटी एवढ्याच किरकोळ असतील तर त्याची दखल घेण्याचे मुख्यमंत्र्यांना काय कारण होते आणि हा टास्क फोर्स तरी त्यांनी कशासाठी निर्माण करायला हवा होता हा प्रश्नही अनेकांच्या मनात उद्भवला. मात्र टास्क फोर्सच्या कालच्या मीटिंगनंतर विजय केंकरे यांनी, ‘कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी जे काम केले गेले आहे ते काम पस्तीस टक्के मार्क मिळवण्यासाठी देखील पुरेसे नाही’ हे सांगून 'सरकारी' बाजूची हवा काढून घेतली आहे.

काल झालेल्या मीटिंगमध्ये टास्क फोर्सच्या कलाकार सदस्यांनी ज्याप्रकारे कला अकादमीशी संबंधित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न केले व ज्या प्रकारे कला अकादमीच्या नूतनीकरणात राहिलेल्या त्रुटींची गंभीरता बैठकीत स्पष्ट केली त्यातून टास्क फोर्सच्या अध्यक्षांना या त्रुटीतील खाचाखोचा अधिक स्पष्टपणे नक्कीच कळल्या असाव्यात. 

पस्तीस टक्के ही मार्क न मिळवणाऱ्या नापास कला अकादमीच्या नाट्यगृहात आता ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धा होऊ घातली आहे. अनेक नाट्य कलाकारांनी खुलेपणे कला अकादमीच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. काल या नाट्य स्पर्धेत प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिवस होता तसेच स्पर्धेतील सादरीकरणाचा ड्रॉ देखील काल काढण्यात आला. मात्र ही स्पर्धा कला अकादमीच्या वास्तुत व्हावी यावर कला अकादमी अजूनही ठाम आहे.

स्पर्धेतील कलाकारांचे म्हणणे ऐकण्यासाठी कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी २५ ऑक्टोबर रोजी या कलाकारांबरोबर एक विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत, कलाकारांना त्यांना हव्या असलेल्या‌ साधनसुविधा पुरवण्याचे मान्य करून या नाट्यस्पर्धा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातच घेण्याचे घाटत आहे असे ऐकिवात आहे. योग्य साधन सुविधा पुरवून कलाकारांना नाटक सादर करण्यात पाठबळ देणे हे योग्यच आहे, परंतु आपल्या मर्यादा झाकण्यासाठी अशा प्रकारचे तात्पुरते साहाय्य कोठवर चालणार आहे? 

एकीकडे टास्क फोर्सच्या माध्यमातून कला अकादमीच्या वास्तूच्या नाट्यगृहाच्या उणिवा अधिकच उघड्या पडत चालल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपला ‘इगो’ कुरवाळण्यासाठी कला अकादमी तिथेच नाट्य स्पर्धा घेण्याचा आटापिटा करत आहे. यात मधल्यामध्ये कलाकार मात्र नक्कीच भरडला जाईल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT