Tashkent To Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Tashkent To Goa Flight: ताश्कंद ते गोवा थेट विमानसेवा सुरु होणार, दाबोळीला डावलले मोपाला पसंती

Pramod Yadav

Tashkent To Goa Direct Flight

पणजी: उझबेकिस्तान देशातील ताश्कंद येथून गोव्याला थेट विमानसेवा सुरु होणार आहे. उझबेकिस्तान एअरवेजच्या वतीने नव्या फ्लाईटची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस ही सेवा सुरु होणार आहे. (Uzbekistan to Goa Flight)

मिळालेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तान एअरवेजकडून ताश्कंद ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी थेट विमानसेवा सुरु होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा सुरु असेल. एअरवेजने सार्वजनिक केलेल्या माहितीनुसार एअरबस -ए३२० ही फ्लाईट ताश्कंद ते गोव्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा नियमित सुरु होईल.

दाबोळीला डावलून मोपाला पसंती

दाबोळी विमानतळ घोस्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करतेय, असे विरोधकांकडून होत असलेल्या आरोपात ताश्कंद ते गोवा विमानसेवेसाठी मोपा विमानतळाला पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान कंपनीकडून दाबोळीला डावलण्यात आल्याचे दिसून आले आहे.

पर्यटन हंगामात विमानफेऱ्या वाढणार

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु झाल्यानंतर देश विदेशातून गोव्याला येणाऱ्या फ्लाईट्स वाढत असतात. या हंगामात देखील याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गोव्याला जोडणाऱ्या नव्या फ्लाईट्सची घोषणा होत आहे. देशांतर्गत देखील फ्लाईट्स गोव्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

SCROLL FOR NEXT