तरुण तेजपाल याच्याविरुद्ध सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (In the Goa Bench of the Mumbai High Court) आव्हान दिले आहे.  dainik gomantak
गोवा

Tarun Tejpal Case:सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेण्यास आक्षेप

सरकारतर्फे जोरदार युक्तिवाद, सुनावणी ३१ ऑगस्टला, तेजपाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई तर गोवा सरकारतर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘तहलका’मधील ('Tehelka') सहकारी तरुणीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणातून निर्दोष सुटलेल्या तरुण तेजपाल याच्याविरुद्ध सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात (In the Goa Bench of the Mumbai High Court) आव्हान दिले आहे. याचिकेवरील सुनावणी इन-कॅमेरामध्ये घेण्याची विनंती (Request to take the hearing in-camera) अर्ज तेजपालच्या वकिलांनी केली असून त्याला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने याचिकेत केलेल्या दुरुस्तीवर

उत्तर देण्यासाठी तेजपालच्या वकिलांनी वेळ घेतल्याने ही सुनावणी येत्या ३१ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

तेजपाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई तर गोवा सरकारतर्फे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडत आहे. या याचिकेवर झालेल्या प्राथमिक युक्तिवादवेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी न्यायसंस्थेने दिलेल्या निवाड्यावर बाजू मांडली. न्यायसंस्था लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेला न्याय देण्यास अपयशी ठरली आहे व अशाप्रकारे न्याय पीडितांना मिळाल्यास कोणीही तक्रार दाखल करण्यास धाडस करणार नाही असा युक्तिवाद मेहता यांनी केला तर निवाडा देणाऱ्या न्यायाधीश या महिला होत्या. त्यांनी तो समोर असलेल्या पुराव्याच्या आधारे तो दिला आहे अशी बाजू देसाई यांनी मांडली. गोवा सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. निवाडा होताच व त्याची प्रत मिळाली नसतानाही त्याला त्वरित उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT