Sadanand Sheth Tanawade  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP : ...म्हणून भाजप गाभा समितीची बैठक तानावडे यांचे स्पष्टीकरण

आदिवासी आरक्षणासंदर्भात केंद्रीय नेत्यांची घेणार भेट

दैनिक गोमन्तक

भाजप गाभा समितीची मंगळवारी झालेली बैठक ही संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी होती. गणेश चतुर्थीपूर्वी सर्व नेत्यांनी मतदान केंद्रनिहाय संघटनात्मक कामाचा तेथे जाऊन आढावा घ्यावा, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

या बैठकीत आदिवासी आरक्षणासंदर्भात केंद्रीय नेत्यांची भेट घ्यावी, असा निर्णय झाला नाही, तर तो निर्णय सरकार आणि पक्षाच्या पातळीवर आधीच घेण्यात आला होता, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

ते म्हणाले, आरक्षणाचा विषय पक्ष आणि सरकारने सोडवण्याचा आधीच ठरवले आहे. त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. कालच्या बैठकीत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. नव मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. आज मंडळ अध्यक्षांची बैठक घेऊन त्याची माहिती दिली आहे.

गोवा, महाराष्ट्राला मागे टाकत केरळची 'फाईव्ह स्टार' कामगिरी; 'या' क्षेत्रात पोहचले टॉपवरगाभा समितीच्या बैठकीत राष्ट्रीय सहसरचिटणीस (संघटन) व्ही. सतीश हे ३१ ऑगस्टच्या दरम्यान गोव्यात येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्र निहाय समितीच्या कार्याचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले आहे. काही मतदारसंघात सर्वच मतदान केंद्रावर भाजप समित्यांचे प्रतिनिधित्व नाही. येत्या दोन महिन्यात त्या ठिकाणी समित्या स्थापन करण्याचे ठरवण्यात आले आहे.

चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरल्याचा आनंद भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे व्यक्त करावा आणि आपल्या देशाची ही कामगिरी जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गाभा समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: विद्यापीठ निवडणूक रद्द; एनएसयुआयचा विरोध

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT