Tambdi Surla Mahadev Temple Is Surrounded By Plastic Garbage Dainik Gomantak
गोवा

Tambdi Surla News: तांबडीसुर्लातील मंदिराला प्लास्टिकचा विळखा

Goa Surla News: हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पंचायत, स्वयंसेवी संस्था, क्लब वगैरे स्वच्छता मोहीम राबवीत असतात तरी येथील कचरा समस्या उग्र होत चालली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तांबडीसुर्ला, प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या येथील श्री महादेव मंदिर व परिसराला सध्या प्लास्टिकचा विळखा पडला आहे. तसेच येथील श्री बाराभूमी मंदिर परिसरातील नदीकाठी मद्यपींचा धिंगाणा वाढत चालला आहे.

त्यामुळे नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीतआहेत.

श्री महादेव मंदिर हे पर्यटन नकाशावर प्रसिद्ध असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. मात्र अनेक पर्यटक हे बेशिस्तपणे वागतात व केरकचरा कुठेही फेकतात. या संपूर्ण परिसरात सध्या कचऱ्याचा खच दिसून येतो.

हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पंचायत, स्वयंसेवी संस्था, क्लब वगैरे स्वच्छता मोहीम राबवीत असतात तरी येथील कचरा समस्या उग्र होत चालली आहे. बहुतांश रस्त्याच्या कडेला प्लास्टिक बाटल्या व अन्य कचऱ्याचा खच दृष्टीस पडतो. ''आरोग्य एक्स्प्रेस'' या संस्थेने नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली.

या मोहिमेत सरपंच प्रिया खांडेपारकर, पंच संजना नार्वेकर आदी सहभागी झाले. समावेश होता.

श्री बाराभूमी मंदिर परिसरातील नदीकाठी मद्यपींचा धिंगाणा वाढत चालला आहे. नदीकाठ केरकचऱ्यांनी भरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT