Goa Panjim Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: ताळगावत मालकाच्याच फ्लॅटमध्ये चोरी करुन पसार झालेल्या दोघा चोरट्यांना पकडण्यास पणजी पोलिसांना यश

Goa Police: गोव्यातून पसार झालेल्या दोघा चोरट्यांना पणजी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Police: दिड महिन्यापूर्वी व्हडलेभाट - ताळगाव येथील फ्लॅटमधील दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 3 लाखांचा ऐवज चोरून पसार झालेल्या दोघा चोरट्यांना पणजी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात पणजी पोलिसांना यश आले आहे.

संशयित रमेशकुमार सिंग (26) व जीतेंद्र कुमार ऊर्फ जित्तू मंगिलाल (26) हे सराईत चोरटे असून त्यांच्याविरुद्ध हैद्राबाद तसेच इतर राज्यांमध्येही चोरीचे गुन्हे नोंद आहेत. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

व्हडलेभाट - ताळगाव येथील सतिशकुमार राजपुरोहित याच्याकडे संशयित रमेशकुमार सिंग हा कामाला होता व त्यांच्याकडेच राहायला होता. या संधीचा फायदा उठवून मालकाच्या फ्लॅटमधील रोख रुपये 1.60 लाख तसेच सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. त्यांनी जाताना मालकाचीच दुचाकी घेऊन गेला होता व तो परत आला नसल्याने सुरुवातीला मालकाने तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

गोव्यातून पसार होताना त्याने पणजी बसस्थानकाच्या आवारात दुचाकी ठेवलेली सापडली होती. त्याचबरोबर फ्लॅटमधील रोख रक्कम व दागिने गायब असल्याची तक्रार राजपुरोहित याने दिली होती. त्यानुसार दोघांना अटक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT