Taleigao Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

Taleigao Panchyat Election : ‘बाबूश’ राज संपण्याच्या मार्गावर : सिसील रॉड्रिग्ज

Taleigao Panchyat Election : त्यांच्या उमेदवारांविरोधात लोक आता निवडणुकीत उतरत आहेत, त्यामुळे त्यांचा तोल ढळत चालल्याचे दिसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao Panchyat Election :

पणजी, ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीत आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलविरोधात आम्ही अपक्ष उमेदवार उभे केले.

चार राखीव जागांवर अपक्ष म्हणून आम्ही महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, परंतु त्यातील प्रतिमा शिरोडकर यांच्यावर आमदार मोन्सेरात यांनी दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यांच्या उमेदवारांविरोधात लोक आता निवडणुकीत उतरत आहेत, त्यामुळे त्यांचा तोल ढळत चालल्याचे दिसत आहे.

यावरून ताळगावातील ‘बाबूश राज’ संपत चालले असल्याचे मत ‘ताळगावकर युनायटेड’च्या नेत्या सिसील रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले.

मिरामार येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी फ्रान्सिस कुएल्हो, भुपेश प्रभुदेसाई यांची उपस्थिती होती. ताळगाव पंचायत निवडणुकीत वॉर्ड १ मधून मयूर उसकईकर, वॉर्ड ६ मधून प्रतिमा शिरोडकर आणि प्रभाग ११ मधून कँडिडो डायस यांनी अर्ज मागे घेतले. या अनुषंगाने ही परिषद झाली.

सिसील म्हणाल्या, एका बाजूला महिलांना संधी द्या, महिलांनी पुढे यावे, असे म्हणतात. ३३ टक्के महिला आरक्षण देणार म्हणून सांगितले जाते. निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार आहे, मग त्यांना निवडणूक लढू द्यावे. दोनापावला येथील सुशिक्षित असणाऱ्या वॉर्ड सहामधून प्रतिमा शिरोडकर यांना उमेदवारी दिली होती.

तेथील लोकांनी आमच्या उमेदवाराचे स्वागतही केले होते. एका बाजूला महिलांचे सक्षमीकरण करण्याविषयी गप्पा मारतात आणि दुसरीकडे महिलेस अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणतात, हा कसला न्याय.

कुएल्हो म्हणाले, ताळगावमधील जी दहशत आहे, त्याविरोधात आवाज उठविला जात असल्याचे यातून दिसू लागले आहे. मोन्सेरात यांच्या कुटुंबराजला येतील जनता विटली आहे. ताळगावातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी आम्ही आनंदी आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT