Pradhan Mantri Vishravakarma scheme  Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : प्रधानमंत्री विश्र्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घेणे गरजेचे: रमेश तवडकर

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News : सासष्टी गोव्यासह भारतातील इतर राज्यांत कला कौशल्य जाणणारे विविध प्रकारचे कारागिर आहेत. अशा कारागिरांचा दर्जा उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्र्वकर्मा योजना सुरू केली आहे.

कारागिरांनी या योजनेचा लाभ आपल्या व्यवसाय उन्नतीसाठी घ्यावा, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी आज मडगावात केले.

रवींद्र भवन मडगावच्या प्रांगणात आजपासून राजस्थान हॅंडलूम, हॅंडीक्राफ्ट, ज्युवेलरी व लाईफस्टाईल प्रदर्शन सुरू झाले असून त्याचे उद्‍घाटन केल्यावर सभापतींनी पत्रकारांशी संवाद साधला. मडगावमधील या प्रदर्शनात कारागिरांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या कामाची नजाकत पाहणे प्रत्येकाला निश्र्चितच आवडेल.

गोव्यात सध्या पर्यटन मोसम सुरू झाला असून जग व देशभरातील पर्यटक गोव्यात येत आहेत व या प्रदर्शनाद्वारे त्यांना देशांच्या कारागिरांचे कौशल्य पाहण्याची संधी लाभणार असल्याचेही सभापतींनी सांगितले.

माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले, की नाताळ व नवे वर्ष जवळ पोहोचल्याने या प्रदर्शनाची ही योग्य वेळ आहे.

श्रमधाम आर्मी तयार करणार

सध्या श्रमधामाने गरीब लोकांना घरे बांधुन देण्याचा संकल्प आपण केला असून यंदा १०० व पुढील वर्षी २०० घरे बांधून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे असे सांगून सभापती रमेश तवडकर म्हणाले, की आपण श्रमधाम आर्मी तयार करण्याच्या प्रयत्नात असून कमीत कमी ५००० सदस्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

जर सर्वांनी थोडा थोडा हातभार लावला, तर हजारो घरे बांधून देण्याचा निर्धार सहज साध्य होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT