Swiggy Warehouse Fraud Goa Dainik Gomantak
गोवा

Swiggy Fraud Case: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Swiggy Rs 93 Lakh Theft: कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी वेअरहाऊसचे आतिष पाटील यांनी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: स्विगी नेटवर्क लिमिटेडच्या झुआरीनगर-सांकवाळ येथील लीड वेअर हाऊसमध्ये काही कर्मचाऱ्यांनी खोट्या नोंदी करून तब्बल ९३ लाख ३८ हजार रुपयांचा माल परस्पर हाऊसबाहेर नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी वेअरहाऊसचे आतिष पाटील यांनी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांकवाळ येथे स्विगी नेटवर्क्स लिमिटेडच्या वेअर हाऊसमधून २२ मे ते ६ जुलै २०२६ यादरम्यान बनावट कागदपत्रांद्वारे लाखो रुपयांचा माल परस्पर वेअर हाऊसबाहेर नेल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी वरिष्ठ कार्यकारी इन्व्हेंटरी अमित उठवाळे (ठाणे, महाराष्ट्र), पर्यवेक्षक ऋषभ राज (बिहार). इन्व्हेंटरी पर्यवेक्षक वैशाली पांडे (गुजरात), लोडर आफताब, साईट इनचार्ज आरिफ इसानी तसेच इतर अज्ञात व्यक्ती यांची संशयित म्हणून नावे नोंदविली आहेत.

लाखोंच्या सिगारेट्स, मोबाईल लंपास

संशयितांनी बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून वेअर हाऊसच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे ६७ लाख २९ हजार १७२ रुपयांच्या सिगारेट्स व २५ लाख ८ हजार ९३० रुपये किमतीचे मोबाईल असा मिळून ९३ लाख ३८ हजार १०२ रुपयांचा माल वेअर हाऊसबाहेर नेला. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT