Sweet Lake Arambol Goa Dainik Gomantak
गोवा

Sweet Lake : हरमलमधील स्वीट लेक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर

गोड्या पाण्याच्या अर्थात स्वीट लेकमुळे मोठ्या संख्येने पर्यटक हरमलमध्ये दाखल होत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील पर्यटनस्थळांमध्ये हरमलचा समुद्रकिनारा प्रसिद्ध असला तरी स्वीट लेकच्या अस्तित्वामुळे हरमल बीच जगप्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी स्थानिक आणि परप्रांतीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मनमानी कारभार करत अतिक्रमण केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा स्वीट लेक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असून निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान नदीच्या बाजूला खेटून हट्स उभारण्यात आले असून कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवाने दिले आणि सांडपाण्याचा निचरा होणारी सुविधा कोठे उभारली असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. त्यातील सांडपाण्याने नदीचं पाणी प्रदूषित होत असून अधूनमधून पाणी फेसाळ बनते आणि त्यामुळेच नदीचं अस्तित्व धोक्यात असल्याची भीती वर्तवली जात आहे.

या गोड्या पाण्याच्या अर्थात स्वीट लेकमुळे मोठ्या संख्येने पर्यटक हरमलमध्ये दाखल होत असतात. शांत आणि विस्तीर्ण परिसर असल्याने पर्यटक निवांतपणा अनुभवण्यासाठी हरमलला पसंती देतात. मात्र याठिकाणी आल्यावर पर्यटकांचा भ्रमनिरास होत असून स्वीट लेक परिसराची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. या परिस्थितीला स्थानिक लोकांसह पर्यटकही जबाबदार असल्याने स्वीट लेकचं अस्तित्व धोक्यात आहे. या लेकमध्ये काही बेशिस्त पर्यटक हातात बिअरच्या बाटल्या हातात घेऊन बोटीने भ्रमंती करताना दिसून आले आहेत.

गेल्या महिन्यात मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी स्वीट लेकची पाहणी केली होती आणि संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतर कसल्याच प्रकारची हालचाल झाली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट कारवाई करून जलप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिकांमधून जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Goa Live News: भोम-अडकोण पंचायतच्या ग्रामसभेत ठराव

SCROLL FOR NEXT