Goa Government Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

Swasth Nari Sashakt Parivar scheme: गोव्‍यासह देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्‍या ‘स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार’ योजनेचा राज्‍यभरातील महिलांनी लाभ घ्‍यावा.

Sameer Amunekar

पणजी: गोव्‍यासह देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्‍या ‘स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार’ योजनेचा राज्‍यभरातील महिलांनी लाभ घ्‍यावा आणि आपल्‍या जवळच्‍या प्राथमिक, सामुदायिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये जाऊन शारीरिक तपासणी करून घ्‍यावी, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७५ व्‍या वाढदिवसानिमित्त बुधवारी पणजीतील कला अकादमीत आयोजित राज्‍यस्‍तरीय ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमानंतर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘सेवा पखवडा कार्यक्रमादरम्‍यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍हर्च्युअल पद्धतीने नागरिकांनी संवाद साधला.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याहस्‍ते विविध महिला स्वयं-सहाय्‍य गटांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शिवाय लखपदी दीदी, बँक सखी, उत्‍कृष्‍ट काम केलेले सरकारी कर्मचारी आणि स्‍वयंसेवी संस्‍थांचाही गौरव करण्‍यात आला.

यावेळी मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कंदवेलू, मंत्री बाबूश मोन्‍सेरात, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, निळकंठ हळर्णकर, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार संकल्‍प आमोणकर, आलेक्‍स रेजिनाल्‍ड, रुडॉल्‍फ फर्नांडिस, महापौर रोहित मोन्‍सेरात आदी उपस्‍थित होते.

दरम्‍यान, केंद्र आणि राज्‍यातील भाजप सरकार हे युवा, नारी, किसान सन्‍मान आणि गरीब कल्‍याण या चार स्‍तंभांवर उभे आहे. त्‍याच धर्तीवर पंतप्रधान मोदींनी देशभरातील महिला आणि आदिवासी समाजातील नागरिकांसाठी विविध योजना घोषित केल्‍या. महिलांसाठी राबवलेल्‍या ‘स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार’ या योजनेचा गोव्‍यातील सर्वच महिलांनी लाभ घ्‍यावा.

त्‍यांनी प्राथमिक तसेच सामुदायिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये जाऊन तपासणी करून घ्‍यावी. त्‍यांची तपासणी, औषधोपचार आणि शस्‍त्रक्रियाही मोफत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पहिली मुलगी झालेल्‍या जोडप्‍याला पाच हजार आणि दोन मुली असलेल्‍यांना सहा हजारांचे हप्‍ते केंद्र सरकारने जारी केले.

त्‍याचा फायदा राज्‍यातील अनेक जोडप्‍यांना झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राष्ट्रीय पोशन माह, पंतप्रधान मातृ वंदना योजना तसेच सुमनशक्ती चॅटबोटच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला सरकारकडून प्राधान्य देण्यात येत असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी नमूद केले.

स्‍वदेशी उत्‍पादनांच्‍या विक्रीवर भर द्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादन खरेदी करण्यावर तसेच व्यापाऱ्यांनी स्वदेशी उत्पादन विक्रीवर अधिक भर देण्‍याचे आवाहन केले आहे. त्‍यानुसार गोव्यातील व्यापाऱ्यांनीही देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’चे स्‍वप्‍न साकार करण्यासाठी स्वदेशी उत्पादनांच्‍या विक्रीवर भर देणे गरजेचे आहे, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

SCROLL FOR NEXT