Dabolim Crime News Dainik Gomantak
गोवा

Dabolim Crime News: गूढ, संशयास्पद! वाडे-दाबोळीत आढळला साडेपाच वर्षीय मुलीचा मृतदेह

Dabolim Crime News: वाडे दाबोळीत एका निर्माणाधीन इमारतीमागे मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.

Pramod Yadav

Dabolim Crime News

वाडे दाबोळीत साडेपाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ निर्माण झाली. पहाटे तीन ते चारच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर उपाचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिला मृत घोषित करण्यात आले.

वाडे दाबोळीत एका निर्माणाधीन इमारतीमागे मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास वास्को पोलिसांना चिखली आरोग्य केंद्रातून फोन आला. रुग्णालयात साडेपाच वर्षांच्या मुलीला आणले असून, तिच्या मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वास्को पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुलीच्या नाकातून फेस देखील येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाडे दाबोळीत एका निर्माणाधीन इमारतीच्यामागे संशयास्पद स्थितीत मुलीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी काम करणारे सर्व कामगार बिगर गोमन्तकीय असल्याचे सावंत यांनी सांगितले. इमारतीसाठी काम करणाऱ्या सर्वांना पोलिस स्थानकात आणले असून, त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने मुलीसोबत काही गैरवर्तन झाले का? किंवा कोणत्या इतर कारणातून ही घटना घडली अशा शक्यता सध्या स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Live News: कूटबण जेट्टीवर आढळले कॉलराचे सहा रुग्ण

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

SCROLL FOR NEXT